मुंबई : बदलापूरमध्ये अत्याचाराची अत्यंत विकृत घटना घडली. या दुष्कृत्य आणि विकृतीविरोधात उद्रेक उसळला, ते आंदोलन राजकीय स्टंट वाटणे ही विकृत मानसिकता आहे. हे विकृत नराधमांचे पाठीराखे आहेत, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांचा समाचार घेतला. या घटनेविरुद्ध महाविकास आघाडीने शनिवारी (ता. २४) महाराष्ट्र बंदची हाक दिली असून, हा बंद राजकीय नाही. सर्वांनी या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.