एकनाथ शिंदे, ४० MLA अन् भाजप तरी उद्धव ठाकरे देतील तगडी फाईट, राष्ट्रवादी-काँग्रेसचा प्लॅन काय?

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Updated on

महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मजबूत परिस्थितीत आले आहेत. याचे संकेत छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत मिळाले. जिथे उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचे प्रमुख दाखवण्यात आले. विरोधकांचे प्रमुख नेते म्हणून उद्धव ठाकरे समोर आले. यासाठी विविध राजकीय कारणे चर्चेत आहे.

संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी विशेष खुर्ची होती. व्यासपीठावरील बॅनरवर त्यांचा सर्वात मोठा फोटो होता. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे हेच मोठे नेते असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. खेड आणि मालेगावमधील मोठमोठ्या सभांनी पक्षात फूट पडल्यानंतरही झालेली गर्दी पाहता. उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे नेतृत्व करणार असल्याचा संदेश दिल्याचे बोलले जात आहे.

घराण्यावरील निष्ठा हा शिवसेनेत मोठा घटक-

शिवसेनेचा मोठा आधार हा ठाकरे घराण्याशी निगडित भावना आहेत. सामान्यांच्या मनात ठाकरे घराण्याबाबत असलेल्या भावना आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. घराण्यावरील निष्ठा हा शिवसेनेत मोठा घटक मानला जातो. याची उद्धव ठाकरे यांना निवडणुका जिंकण्यासाठी मदत होऊ शकते. याशिवाय आणखी एक कारण म्हणजे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह अनेक सदस्य अजूनही उद्धव यांच्यासोबत आहेत. यावरून त्यांचा संघटनात्मक पाया मजबूत असल्याचे दिसून येते.

भाजपला देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ताकदीचा अंदाज-

२०१४ मध्ये जेव्हा विधानसभा निवडणुकानंतर जेव्हा शिवसेना दोन नंबरचा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपला देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ताकदीचा अंदाज आला होता. राज ठाकरे देखील उद्धव ठाकरेंसमोर टिकू शकले नाही. आदित्य ठाकरे यांच्या सभेला होत असलेल्या गर्दीने देखील भाजपला घाम फोडला. त्यामुळे भाजप एकनाथ शिंदे सोबत असूनही चिंतेत आहे. त्यामुळे ठाकरेंची सभा होते, त्या ठिकाणी परत सभा घेतल्या जाते.

Uddhav Thackeray
Shivsena: "तानाजी सावंत मंत्रिपदावर खूश नाहीत, त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं"

मुस्लीम समाजातूनही ठाकरेंना पाठिंबा-

अजूनही सर्वसामान्य शिवसेना कार्यकर्त्यांच्या उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा आहे. त्यांना असलेला पाठिंबा अजूनही कायम असल्याचे बोलले जात आहे, ही भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. याशिवाय मुस्लीम समाजातूनही ठाकरेंना पाठिंबा वाढला आहे. मुस्लिमबहुल लोकसंख्या असलेल्या मालेगाव येथील सभेत त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. एकनाथ शिंदे, ४० आमदार आणि भाजप जेवढी गर्दी सभेला जमवतात. तेवढी गर्दी हे फक्त उद्धव ठाकरे जमवतात. यावरुन सामान्यांच्या मनात ठाकरे घराण्याप्रती असलेली निष्ठा स्पष्ट होते.

शरद पवार यांची मोठी भूमिका-

आगामी काही निवडणुकांमध्ये यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते म्हणून पुढे करू शकतात. यामागे शरद पवार यांची मोठी भूमिका असेल स्वत: पडद्यामागे राहूण ते सर्व सुत्र चालवू शकतात. यापूर्वी देखील शरद पवार यांनी १९९६ मध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले छगन भुजबळ आणि २०११ मध्ये भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले धनंजय मुंडे यांनी समोर करुन मतदान मिळवण्याचा प्रयत्न केला होता. 

Uddhav Thackeray
Pawar Vs Patole: जेपीसीवरुन पवारांची काँग्रेसविरोधी भूमिका; पटोलेंनी दिला कोळसा घोटाळ्याचा संदर्भ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.