जळगावः जळगावच्या पाचोरा येथे आज ठाकरे गटाची सभा झाली. उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारसह राज्य सरकारवर टीकास्र सोडलं. शिवाय एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर जोरदार आसूड ओढले.
यावेळी उद्धव ठाकरेंनी घराणेशाहीचं समर्थ केलं. ते म्हणाले की, वैशालीताई आर.ओ. तात्यांचं काम घेऊन पुढे जात आहेत. ते म्हणतील ही घराणेशाही आहे. असेल. पण घराणेशाहीतही घराण्याची परंपरा असते. अरे तुला आगे ना पिछा. तुला कोणी नाही. झोळी घेऊन निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देशील, त्याचं काय करायचं. जनता भिकेला लागेल,त्यांचं काय?
हेही वाचाः संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
'घराण्याची परंपरा असते. सगळे तिकडे लोभासाठी जात असतांना वैशालीताई तुम्ही लढण्यासाठी इथे आहात. आता मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. निवडणूक आली तर वैशालीताईंच्या पाठिशी तुम्हाला उभं राहावं लागेल. पाचोऱ्यात गद्दाराला गाडावं लागेल.' अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी मुद्दा मांडला.
बहिणाबाई यांची कविता केली सादर
राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. तरुण मुलं आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. तरीही राज्याचे नाथ बांधावर यायला तयार नाहीत. बहिणाबाईंनी एक कविता केली होती. इमानाले इसरला त्याला नेक म्हणून नये, जो जन्मदात्याला इसरला त्याला लेक म्हणू नये... असं म्हणून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडलं.
पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की, शिवसेना कुणाची हे पाकिस्तानला विचारलं तर ते देखील सांगतील पण आमच्याकडील मोतीबींदू झालेल्या निवडणूक आयोगाला हे कळत नाही. त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल. पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी ओळखले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.