Uddhav Thackeray : ठाकरेंचा जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीला पाठिंबा; म्हणाले, "मी मुख्यमंत्री असतो तर..."

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांकडून आज केलेल्या आंदोलनात उद्धव ठाकरे देखील सहभागी झाले होते.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySakal
Updated on

नागपूर जुन्या पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी जर सध्या मी मुख्यमंत्री असतो तर तुमच्यावर ही आंदोलन करण्यची वेळच आली नसती असं ठाकरे म्हणाले आहेत.

जुन्या पेन्शन योजनेसाठी नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर हजारोंच्या संख्येने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, शासकिय नोकरदार वर्ग गोळा झाला. या मागणीसाठी बऱ्याच दिवसांपासून राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. यानंतर आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासोबत ठाकरे गटाच्या इतर काही आमदारांनी देखील आंदोलनस्थळाला भेट दिली. आंदोलन कर्त्यांकडून काल भेट घेत उद्धव ठाकरे यांना आंदोलनात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली होती.

Uddhav Thackeray
Sharad Pawar : "अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण...", सुप्रिया सुळेंची पवारांसाठी भावनिक पोस्ट

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अडीच वर्ष आपलं सरकार होतं, तेव्हाही पाच दिवसांचा आठवडा हा मुद्दा नुसता चर्चेत येत असे, तो निर्णय मुख्यमंत्री म्हणून मी घेतला. दुर्दैवाने त्यानंतर कोरोना आला. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा जुनी पेन्शन योजना लागू करता येते की नाही याबद्दल चर्चेला सुरूवात झाली होती. पण गद्दारांनी गद्दारी करून आपलं सरकार पाडलं. जर मी मुख्यमंत्री असतो तर तुम्हाला आजचा हा मोर्चा काढावा लागला नसता.

सरकारच्या कागदावरच्या घोषणा जमीनीवरती आणण्याचं काम तुम्ही करत असता. इतक्या महत्वाच्या घटकाला जर स्वतःच्या न्याय मागणीसाठी आक्रोश करावा लागत असेल आणि सरकार त्याकडे कानाडोळा करत असेल तर त्यांना पेन्शन नाही तर टेन्शन देण्याची गरज आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Sharad Pawar Birthday: शरद पवारांचे 84व्या वर्षात पदार्पण; राजकीय विरोध विसरून PM मोदींनी दिल्या शुभेच्छा!

माझा पक्ष, निवडणूक चिन्ह चोरलं आहे, मी मुख्यमंत्री असतो तर निर्णय घेऊ शकलो असतो. पण आज मी काही नसताना तुम्हाला ताकद आणि विश्वास द्यायला आलो आहे. मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्या लढ्यात शिवसेना प्रत्येक पावलावर सहभागी होईल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.