Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंच्या टार्गेटवर राज्यातील दोन 'पाटील'; नगर अन् जळगावचा घेतला आढावा, दिला हा कानमंत्र

 Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal
Updated on

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसोबतच विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पडझडीचा आढावा आजच्या बैठकीत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला. विशेष करून जळगावमध्ये शिवसेनेच्या चारही आमदारांनी ठाकरेंची साथ सोडल्याने जळगावमध्ये मोठे आव्हान ठाकरेंसमोर उभे राहिले आहे.

जळगावातील सर्व आमदार शिवसेनेच्या शिंदे गटासोबत गेल्याने ठाकरे गटाला या भागात खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. जळगाव ग्रामीणचे आ. गुलाबराव पाटील, चोपडाच्या आ. लता सोनावणे, पाचोराचे आ. किशोर पाटील, एरंडोलचे आ. चिमणराव पाटील हे सर्वजण मुख्यमंत्री शिंदेंसोबत आहेत. जळगावातील सर्वच्या सर्व आमदार शिंदे गटात गेल्याने या पक्षफोडीला उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. (

त्याचप्रमाणे नगरमध्येही खासदार सुजय विखे पाटलांचा पराभव करून त्याजागी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारी करा, असे आदेश ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी दिले.

 Uddhav Thackeray
Mumbai University Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित; रातोरात काढलं परिपत्रक

ठाकरे गटाचे जळगावचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी उद्धव ठाकरेंसोबत प्रदीर्घ बैठक झाल्याची माहिती दिली. महाविकास आघाडी म्हणून आमच्या जागांवर निवडणूक लढवणार आहोत. जर काही कारणांमुळे महाविकास आघाडी होऊ शकली नाही तर स्वतंत्रपणे लढण्याची तयारी असल्याचे भंगाळे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ‘मातोश्री’वर दररोज वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावले जात आहे.

 Uddhav Thackeray
Petrol Price: पेट्रोल होणार स्वस्त, निवडणुकीच्या तोंडावर महागाई रोखण्यासाठी मोदींची 1 लाख कोटी रुपयांची योजना तयार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.