World Tourism Day: महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ मोबाईल अ‍ॅपवर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पर्यटन दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात या अ‍ॅपचे अणावरन केले.
World Tourism Day
World Tourism DayTeam eSakal
Updated on

जागतिक पर्यटन दिनानिमीत्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात उपस्थिती लावली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पर्यटन विभागाची नवी वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅप्लीकेशनचे अनावरन केले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पर्यटन विभागाने केलेल्या कामाचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी कौतून केलं. लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका बसला असताना देखील पर्यटन विभागाने नवीण सुविधा, रोजगाराच्या सुविधा आणि आखलेले धोरण हे कौतूस्कापद आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्य मंत्री आदिती ठाकरे आणि पर्यटन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचं कौतूक केलं.

पर्यटन विभाग नेहमी दुर्लक्षीत असणारा विभाग आहे. मात्र पर्यटन विभागाने यावेळी अत्यंत चांगलं काम केलं असून, महाराष्ट्रातली वेगवेगळी पर्यटन स्थळं ही महाराष्ट्रासाचं वैभव असल्याचं मत यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील पर्यटन विभागाने केलेल्या कामाचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं.

दरम्यान, या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर राज्य मंत्री आदिती तटकरे या देखील व्हीडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.