Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySakal

Uddhav Thackeray News : पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो, तर भाजप नेत्यांना…; ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Published on

एकनाथ शिंदे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेत अजित पवारांनी देखील बंड केलं आणि राज्याच्या राजकारणात भुकंप झाला. या दोन्ही बंडानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्ष उभारणीसाठी राज्याचा दौरा करत आहेत.

उद्धव ठाकरे याच पार्श्वभूमिवर दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. ठाकरेंनी वाशिम येथील पोहरादेवीचं दर्शन घेत त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली. दरम्यान यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर देखील भाष्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फूटीबद्दल बोलताना लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर भाजपकडून हे सगळं केलं जात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यांनी सांगितलं की, आता राज्यात फोडाफोडीचे धंदे चाललेत. त्यावेळी माझं आणि अमित शाह यांचं ठरलं होतं, ते त्यांनी कितीही नाही म्हणो, मी शिवाजी पार्क वर आई-वडिलांची शपथ घेऊन बोललो होतो, आज पोहरादेवीची शपथ घेऊन बोलतो, की जे ठरलं होतं त्याच्यामध्ये अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री हे ठरल्याप्रमाणे केलं असतं, तर आज भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना इतर पक्षांच्या सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray
Bhujbal On Sharad Pawar : तुम्ही ज्यांना सांभाळलं ते अजित पवार तर…; छगन भुजबळांचा पुन्हा पवारांवर घाव

आज ज्येष्ठ भाजपचे नेते आहेत, ज्यांनी भाजपसाठी खस्ता खाल्ल्या ते बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांच्या सरबराईमध्ये लागला आहेत, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला. अनेक कार्यकर्ते जे माझ्या संपर्कात येतात ते आम्ही किती काळ सहन करायचं असं बोलून दाखवतात असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Uddhav Thackeray
Sharad Pawar News : वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसलाच नाही! शालिनीताईंचा युटर्न; पवारांच्या मदतीला धावल्या…

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.