''उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात येऊ न देण्याचं कारस्थान, आता २१ डिसेंबरला...'', संजय राऊतांनी केली भूमिका जाहीर

Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray Eknath Shindeesakal
Updated on

मुंबईः मुंब्र्यातील शंकर मंदिर परिसर येथे २२ वर्षांपासून असलेली शिवसेनेची मध्यवर्ती शाखा रात्री बुलडोझर लावून पाडण्यात आली आहे. या शाखेला भेट देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी सायंकाळी मुंब्र्यात जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय.

शनिवारी सायंकाळी ४ वाजता उद्धव ठाकरे या शाखेची पाहणी करणार असून स्थानिक व मुंब्रावासियांशी ते संवाद साधणार आहेत. यावेळी पदाधिकाऱ्यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुंब्र्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Shivsena: "गजाभाऊ...तुम्ही फक्त अर्ज भरणार अन् मुलाला बिनविरोध निवडून आणणार, खंजीर खुपसू नका"; रामदास कदम यांचा गंभीर आरोप!

या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, आज संध्याकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे मुंब्र्याला जात आहोत. आम्ही नुसता समाचार घेणार नाहीत तर छाताडावर पाय देऊन उभे राहणार आहोत. असंख्य शिवसैनिक मुंब्र्यात येणार आहोत.

राऊत पुढे म्हणाले, दहशत आणि पैशांच्या जोरावर शिवसेनेच्या शाखेवर बुलडोजर फिरवलं, ही खऱ्या अर्थाने मोघलाई आहे. जे आपल्या विचारांचे नाहीत, त्यांच्या घरावर नांगर फिरवणं योग्य नाही. बुलडोजर चालवून मिंदे गटाने त्यांचा डीएनए दाखवून दिला आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Tanaji Sawant Video: "मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, कुणी राडा केला तर..."; तानाजी सावंतांच्या वक्तव्याने खळबळ

''उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात न येऊ देण्याचं कारस्थान रचलं आहे. शिवसैनिकांना तडीपार करण्याच्या धमक्या पोलिस देत आहेत. जे पोलिस हजारोंच्या फौजफाट्याने कामाला लागले आहेत, ते शाखेवर बुलडोजर चालवलं तेव्हा कुठे होते? आज ज्यांची तुम्ही चाकरी करत आहात, तो मालक २१ डिसेंबरला सत्तेत राहणार नाहीत'' असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.