Uddhav Thackeray: "दुर्लक्ष झाल, पण तुम्ही सगळ्यांनी ठरवा कधी यायचं अन् ठिकाण काय?"; उद्धव ठाकरेंनी दंड थोपटले!

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Updated on

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे पालघर दौऱ्यावर जाणार आहेत. यापूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे यांनी देखील टोला लगावला. जनतेला काय पाहिजे हे सरकारला कळत नसेल तर जनतेचा आवाज शिवसेना बनेल असे उद्धव ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या नावासमोर हिंदूहृदयसम्राट असे बॅनर काहीदिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. यावर देखील उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेनेतील बंडानंतर पालघरमध्ये एकनाथ शिंदे यांचे वजन वाढले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी देखील आता कंबर कसली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, पालघरकडे माझ दुर्लक्ष झाल मात्र लवकरच मी पालघर दौरा करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी ठरवा कधी यायचं आणि ठिकाण काय आहे. तिथल्या लोकांचे मुद्दे उपस्थित करू. आदिवासी व इतर समाज असतील त्यांच्यासाठी हा दौरा करूया. संपूर्ण पालघर जिल्ह्याची मी पाहणी करणार आहे. माझे पालघर भागाकडे दुर्लक्ष झाले हे मला मान्य करावं लागेल. पोटनिवडणूक लढलो त्यानंतर लोकसभा झाली ती जिंकलो. येणाऱ्या निवडणुकीत भगवा झेंडा कायम ठेवायचा आहे.

आता जे वातावरण देशात आहे. त्यावर मी जेव्हा जाहीर सभा घेईन तेव्हा बोलेनच. मी कोणा व्यक्ती विरोधात नाही मी वृत्ती विरोधात आहे. समोर दिसत असलेली हुकूमशाही तोडून मोडून टाकली नाही तर पुन्हा कधीच होणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Hardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून खेळणार पांड्या, पण अंबानींच्या पर्समध्ये पैशांची कमी! कसं होणार शक्य?

उद्धव ठाकरे म्हणाले, पालघर, ठाण्यातील लोकांनी पक्षात प्रवेश केला. असे दृश्य फार दुर्मिळ आहे. कारण सत्ताधारी पक्षाकडे लोक जात असतात. पण आपल्याकडे लोक येत आहेत. (Latest Marathi News)

या देशात नव्हे तर जगात देखील एकच हिंदूहृदयसम्राट म्हणजे बाळासाहेब ठाकरे. ती उपाधी देखील आता चोरु पाहतायेत. या राजकारणातील गद्दारांना गाडायला मला वेळ नाही लागणार आई एकविरेचे छत्र आपल्या डोक्यावर आहे. मला खात्री आहे आपण जिंकणार आहोत, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Uddhav Thackeray
Maratha Reservation: कुणबी दस्तावेज ऑनलाइन बघता येणार... सरकारकडून प्रक्रियेला सुरुवात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.