Uddhav Thackeray: अदानी चौकशी प्रकरणी उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, जाब विचारला...

अदानी प्रकरणी जेपीसी चौकशीवरून विरोधकांमध्ये मतभिन्नता असल्याचे पाहायला मिळत आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySakal
Updated on

Uddhav Thackeray: अदाणी प्रकरणाची चौकशी व्हावी, असं मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताच्या लोकसंवाद या क्रार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. या प्रकरणात जेपीसी चौकशी का महत्त्वाची आहे यावर त्यांनी भाष्य केलं आहे.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे कष्टाचे हजारो कोटी रुपये कुठे गेले, याचा शोध घेण्यासाठी अदानी उद्योग समूहाची नि:पक्षपातीपणे चौकशी झालीच पाहिजे.

ती चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून करायची की सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीकडून करायची यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ती संयुक्त संसदीय समितीद्वारे केली जावी. करण्यात येणारी चौकशी ही नि:पक्षपाती आणि लवकरात लवकर झाली पाहिजे.

पण अदानी घोटाळय़ावरून ज्यांना जाब विचारला जात आहे त्यांनी उत्तर देणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला. (Uddhav Thackeray's big statement in the Adani inquiry case says The inquiry should be conducted by a Joint Parliamentary Committee)

तसेच संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात फुलवाल्याची चौकशी केली जाते. जर फुलवाल्याची चौकशी केली जात असेल तर हजारो कोटी रुपयांचे प्रकरण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे.

Uddhav Thackeray
Adani Vs Hindenburg: अदानी प्रकरणावर मोबियस कॅपिटलचे मोठे वक्तव्य; हिंडेनबर्गचा अहवाल...

अदानी प्रकरणी जेपीसी चौकशीवरून विरोधकांमध्ये मतभिन्नता असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अदानी प्रकरणाची चौकशी जेसीपीमार्फत नको तर निवृत्त न्यायमूर्तींमार्फत व्हायला हवी अशी भूमिका मांडली होती.

जगातील श्रीमंत व्यक्ती असलेल्या अदानींच्या कंपन्यांमधील घोटाळा हिंडेनबर्ग अहवालामुळे बाहेर आला.  या अहवालाला अदानी  कोणतेही ठोस उत्तर देऊ शकले नाहीत.

Uddhav Thackeray
पाठ्यपुस्तकांत वह्यांची घुसखोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.