Uddhav Thackeray : शाखा जमीनदोस्त केल्याचा वाद चिघळणार? मुंब्रा-ठाण्यात ठाकरेंच्या स्वागताचे होर्डिंग्ज फाडले

शाखा जमीनदोस्त केल्यानंतर आज उद्धव ठाकरे मुंब्रा शहरात येणार आहेत.
Udhhav Thackeray Mumbra visit today sivsena shakha maharashtra Politics
Udhhav Thackeray Mumbra visit today sivsena shakha maharashtra Politics
Updated on

सेनेच्या शाखेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (शनिवार) मुंब्रा येथे भेट देणार आहेत. या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून दिवळीच्या पूर्वसंध्येला ठाकरे यांचा मुंब्रा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

दरम्यान या दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा आणि ठाणे परिसरात लावलेले बॅनर्स फाडण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पोलिस प्रशासनाला धारेवर धरलं आहे. दरम्यान हे होर्डिंग्ज फाडल्याने शिवसेनेच्या दोन्ही गटात वाद पेटण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांनी मुंब्रा येथे शिवसेनेच्या शाखा सुरू केल्या होत्या. शिवसेनत फूट पडल्यानंतर या शाखेवरून दोन्ही गटात वाद सुरु झाला. मुंब्रा येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला होता. या वादामुळे एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱअयांनी जेसीबी लावून शाखा जमीनदोस्त केली. याच जागेवर भव्य शाखा उभारून भूमिपूजन करण्यात आलं होतं.

मुस्लीम बहूल असून देखील मुंब्रा येथे शिवसेनेचं वर्चस्व राहीलं आहे. फूटीनंतर मुंब्रा येथील अनेक माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. दरम्यान ही शाखा पाडल्याने उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा निवनडणूकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. यादरम्यान आज या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकर मुंब्र्यात येत आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी स्वागतासाठी लावलेले होर्डिंग्ज फाडण्यात आले आहेत. त्यामुळे वादाची शक्यता आहे.

Udhhav Thackeray Mumbra visit today sivsena shakha maharashtra Politics
Pune Accident : पुण्यातील जांभुळवाडी-दरी पुलावर भीषण अपघात; कंटेनरची ४ ते ५ वाहनांना धडक, दोघे ठार

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाडांनी ठाणे पोलीसांना आपण होर्डिंग्ज फाडण्यात येतील अशी माहिती दिली, त्यांनी निश्चित राहा असं सांगितलं तरी देखील होर्डिंग्ज फाडण्यात आल्याचं म्हटलं आहे. आव्हाडांनी फाडलेल्या होर्डिंग्जचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी स्वतः मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना भ्रमण ध्वनिवरून संपर्क करुन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात लावलेले होर्डिंग्ज फाडण्यात येतील,अशी शंका व्यक्त केली होती. यावर त्यांनी,"असे काहीही होणार नाही,आपण निश्चिंत रहा,आमची सर्वत्र नजर आहे",अस मला मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले होते.

आज दूपारी उद्धव साहेबांचा ठाण्यात कार्यक्रम होणार आहे.त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने हे होर्डिंग्ज शहरात लावलेले होते.यातील 90% होर्डिंग्ज आता फाडण्यात आले आहेत.मागील वर्षभरात आम्हाला असे अनेक अनुभव आलेले आहेत. एक होर्डिंग फाडायला किमान 15 मिनिट तरी लागतात.आणि "सर्वत्र नजर असणाऱ्या" पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही.आता पोलीस मला म्हणत आहेत की,"उद्धव साहेबांना आम्ही मुंब्र्यात येऊच देणार नाहीत..!"

असो, तरीदेखील मी मुंब्रा पोलीस स्टेशनचे आणि ठाणे शहर पोलिस यांचे आभार मानतो.ते "त्यांची ड्युटी" मोठ्या निष्ठेने करत आहेत.

"मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है,

वही होता है,जो मंजुरे खुदा होता हैं..!"

Udhhav Thackeray Mumbra visit today sivsena shakha maharashtra Politics
Maratha Reservation: बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा: माजी मुख्यमंत्र्यांनी केली मागणी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.