उजनी धरण 100 टक्के भरले! दरवर्षी धरण पूर्ण भरूनही उन्हाळ्यात पाणीसाठा मायनसच; आता काटेकोर वार्षिक नियोजनावर जिल्‍ह्याची भिस्त

संपूर्ण जिल्हावासीयांसाठी जिव्हाळ्याच्या अशा उजनी जलाशयाने गतवर्षीच्या तुलनेत यंदा ६६ दिवस आधीच प्लसमध्ये येण्याची किमया केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा नियोजनाच्या नावाने चांगभले होऊ नये म्हणजे मिळविले. यावर्षी तरी टेल एंडच्या शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार व काटेकोर नियोजनाची गरज आहे.
Ujjani Dam :दमदार पावसानंतर किती भरले उजनी धरण? वाचा काय आहे लेटेस्ट अपडेट
Ujjani Damsaka
Updated on

सोलापूर : जिल्ह्याची वरदायिनी व संपूर्ण जिल्हावासीयांसाठी जिव्हाळ्याच्या अशा उजनी जलाशयाने गतवर्षीच्या तुलनेत यंदा ६६ दिवस आधीच प्लसमध्ये येण्याची किमया केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा नियोजनाच्या नावाने चांगभले होऊ नये म्हणजे मिळविले. यावर्षी तरी टेल एंडच्या शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार व काटेकोर नियोजनाची गरज आहे.

दर तीन वर्षांनी उजनी धरण शंभर टक्क्यांवर भरून वाहण्याचा अनुभव जमेस आहे. गतवर्षी हे धरण केवळ ६६ टक्क्यांवर येऊन थांबले होते. यंदा पुणे जिल्ह्यातील पावसाने साथ दिल्याने वजा ६६ टक्क्यांवर गेलेले धरण पावसाळा दोन महिने शिल्लक असताना शनिवारी रात्रीपर्यंत प्लस ८० टक्क्यांपर्यंत आले आहे. म्हणजे वजा ६६ अधिक प्लस ७८ असा धरणाचा यंदाचा पाणीसाठा एकूण १४६ टक्क्यांनी वधारला, हे सोलापूरकरांचे सुदैवच म्हणावे लागेल. उजनीच्या वरील सर्व धरणे फुल्ल भरली आहेत. त्यामुळे आता उजनी धरण १०० टक्के भरले असून दौंडचा विसर्ग सध्या ९५ हजार असल्याने धरणातून आता भीमा नदीत २० हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे.

पर्जन्यमानाचा अंदाज तसेच उजनीत येणारा विसर्ग याचा अभ्यास करून तातडीने जिल्ह्यातील कालवे, तलाव भरून घ्यावे लागतील. बोरी मध्यम प्रकल्पात १०.७१ टक्के असलेला जलसाठा समाधानकारक नाही. जवळपास ४१२.८० कोटीच्या एकरुख उपसा प्रकल्पावर आतापर्यंत २५२.३२ कोटींचा खर्च झालेला आहे. तसेच शिरापूर उपसा सिंचन योजना तयार आहे. आता या योजनांचा लाभ घेण्याची वेळ आलेली आहे. हिप्परगा (एकरुख) तलावात ४९ टक्के जलसाठा आहे. यावर सोलापूरच्या काही भागात गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणीपुरवठा होतो. यासाठी विजेचा खर्च येत नाही. एकरुख तलावही भरून घेता येईल.

उजनी जलाशयाने गेल्या वर्षी मे महिन्यात तर यंदा २१ जानेवारीलाच मान टाकल्याने जलसाठा मायनसमध्ये गेला होता. केवळ नियोजनाच्या अभावातून दरवर्षीच या संकटास सामोरे जावे लागते. काही ठराविक भागासच पाण्याचा वारेमाप लाभ मिळतो तर टेल एंडकडील भाग मात्र पाण्याविना होरपळत राहात असल्याचा नेहमीचाच अनुभव आहे.

पाण्यावर सर्वांचा समान अधिकार असल्याने मंगळवेढा, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या तीन दुर्लक्षित तालुक्यांना उजनीच्या पाण्याचा लाभ मिळण्याची गरज आहे. पाण्याचे वाटप समन्यायी पद्धतीने होण्याची गरज आहे. वस्तुतः पुणे विभागातील सर्वात शेवटचे असलेले उजनी धरण आधी भरून नंतर पुणे जिल्ह्यातील धरणे भरण्याचा नियम आहे. परंतु वरील धरणे शंभर टक्क्यांच्या आसपास आल्यानंतर उजनीत पाणी सोडले जाते. उजनीत १२३ टीएमसी जलसाठा असताना ११७ टीएमसी पाण्याचे नियोजन होत असते. त्यामुळे उर्वरित सहा टीएमसी पाण्याचा हिशेब आजतागायत तरी लागला नाही. तर उजनी मायनसमध्ये जाताना सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा करण्यावेळी तिबार पंपिंगमागील ‘अर्थ''पूर्ण खेळीचाही हिशेब लागत नसल्याची ओरड आहे.

लक्ष्यवेधी...

  • उजनीतील उपयुक्त साठा

  • ५३.५७ टीएमसी

  • मृतसाठा

  • ६३.६६ टीएमसी

तारणहार उजनी जलाशय

शंभराहून अधिक पाणीपुवठा योजना, ५४ साखर कारखाने, १४ एमआयडीसी तसेच वीजनिर्मिती, जोडकालव्यांचे जाळे असलेल्या, तब्बल ४० लाखांवर जिल्हावासीयांची भिस्त असलेल्या उजनीचा सोलापूर, पुणे व अहमदनगर या तीन जिल्ह्यांतील भीमातटाला सर्वाधिक लाभ मिळाला. २०२२ मध्ये तब्बल १११.२३ टक्के (१२३.२८ टीएमसी) जलसाठा होऊनही धरण मायनसमध्ये गेल्याने हा संशोधनाचा विषय ठरत आहे. सिंचनासाठी रब्बीत ठरलेल्या तीन पाळ्यांवेळीही पाणी सोडण्याचे नियोजन नसल्याची दरवर्षीच ओरड असते.

प्रादेशिक असमतोलातून असंतोष

उजनीच्या पाण्याचे नियोजन करताना सर्वच तालुक्यांचा विचार करण्याची गरज आहे. त्यातही टेल एंडचा विचार होतच नाही. काही ठराविक भागालाच उजनीचे पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांबरोबरच उजनीच्या पाण्यावाचून दुर्लक्षित तालुक्यातील लोकप्रतिनिधींबद्दल संताप व्यक्त होतो.

निधीच्या नियोजनाची गरज

महाराष्ट्र शासनाने २४ मार्च २०२४ रोजी नाबार्डकडून विविध सिंचन योजनांसाठी १५ हजार कोटींचे कर्ज मंजूर करून घेतले आहे. त्यात उजनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कालवे दुरुस्तीसाठी शंभर कोटीचा निधी मंजुरीचा शासन आदेश काढला आहे. त्याच्या काटेकोर व शिस्तप्रिय नियोजनाची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.