'माझे मित्र विमानतळावर पोहोचताच बॉम्बस्फोट झाला अन्...' विद्यार्थिनीनं मांडली व्यथा

Maharashtra Student Stranded Ukraine Communicate With Nana Patole
Maharashtra Student Stranded Ukraine Communicate With Nana Patolee sakal
Updated on

मुंबई : युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Ukraine-Russia War) सुरू आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील जवळपास १२०० विद्यार्थी अडकले आहेत. त्यापैकी मुंबईतील चैताली या युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीसोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी संवाद साधला. त्यावेळी या विद्यार्थिनीनं तिची व्यथा मांडली. (Maharashtra Student Stranded Ukraine Communicate With Nana Patole)

Maharashtra Student Stranded Ukraine Communicate With Nana Patole
Russia Ukraine War : गुंतवणूकदार धडाम्‌! अहमदनगर जिल्ह्यात मोठे नुकसान

मी सध्या युक्रेनमध्ये वेटरनरीचं शिक्षण पूर्ण करतेय. गुरुवारी सकाळी सहा-साडेसहा वाजतापासून इथं कारवाई सुरू झाली आहे. इथं दुकानातील सामान, जेवण, पाणी, एटीएममधील पैसे सर्व काही संपलं आहे. मी भारतात परतण्यासाठी तिकीट काढलं होतं. २७ फेब्रुवारीला माझी फ्लाईट होती. किव्हमधून विमानाने मी दिल्लीला येणार होते. पण, आता विमानतळ बंद झाले आहेत, अशी व्यथा चैतालीनं मांडली आहे.

माझ्या काही मित्रांची गुरुवारची सकाळची फ्लाईट होती. त्यासाठी ते कीव्ह विमानतळावर पोहोचले. पण, तिथेच सहा बॉम्बस्फोट झालेत. त्यामुळे ते पळत सुटले. आता सर्व विमानतळ बंद करण्यात आलेय. सर्व सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. आमची फ्लाईट खोळंबली आहे. त्यामुळे आम्ही इथं फसलो आहोत. आम्हाला भारतात नेण्यासाठी काहीतरी करा, अशी विनंती विद्यार्थिनीनं नाना पटोलेंना केली. त्यानंतर भारत सरकारला सांगून विशेष विमानानं विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन नाना पटोलेंनी दिलं.

रशियानं गुरुवारी सकाळीच युक्रेनवर हल्ला केला. पहिल्याच दिवशी युक्रेनमधून अतिशय विदारक दृश्य समोर आले आहेत. युद्धाच्या पहिल्या दिवशी १३७ जणांचा मृत्यू झाला आहे. रशियानं अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले केले आहेत. तसेच अणुभट्टीवर देखील ताबा मिळवला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()