Ulhasnagar: अजीज शेखांची राज्यभर चर्चा, सेवनिवृत्तीच्या तोंडावर आयएएसचे यश व मुदतवाढ

Ajiz Shekh Ulhasnagar : पुन्हा उल्हासनगर पालिका आयुक्त पदावर कायम |Again on the post of Ulhasnagar Municipal Commissioner
अजीज शेखांची राज्यभर चर्चा, सेवनिवृत्तीच्या तोंडावर आयएएसचे यश व मुदतवाढ
Ulhasnagar: sakal
Updated on

Ulhasnagar News: सेवनिवृत्तीला आठवडा बाकी असतानाच आयएएस ची सनद मिळवण्याची परीक्षा उत्तीर्ण होऊन जिद्द व चिकाटीचे प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवणारे आणि दोन वर्षांची मुदतवाढ मिळालेले आयुक्त अजीज शेख यांची पुन्हा महाराष्ट्र शासनाने उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.त्यामुळे ते या पदावर कायम राहणार आहेत.

अजीज शेखांची राज्यभर चर्चा, सेवनिवृत्तीच्या तोंडावर आयएएसचे यश व मुदतवाढ
Ulhasnagar: महानगरपालिकेने हस्तांतरित केलेल्या हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकाची कर्जापोटी संपवले जिवन

महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासन(सेवा)विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी तसे कार्यालयीन पत्रक जारी केले आहे.त्यात केंद्र शासन,कार्मिक व प्रशिक्षण विभाग यांनी त्यांच्या अधिसूचनेन्वये आपली भारतीय प्रशासन सेवेत पुढील आदेश होईपर्यंत परिविक्षाधीन(On Probation)नियुक्ती केली आहे.

अजीज शेखांची राज्यभर चर्चा, सेवनिवृत्तीच्या तोंडावर आयएएसचे यश व मुदतवाढ
Ulhasnagar News : उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीकडून 100 क्षयरुग्ण 6 महिन्यांसाठी दत्तक

भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्ती मिळाल्यानंतर शासनाने आपली नियुक्ती आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका या सध्याच्याच पदावर केली आहे.असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

1994 बॅचचे अधिकारी असणारे अजीज शेख यांनी 13 जुलै 2022 रोजी आयुक्तांचा पदभार स्विकारला होता.वयोमानानुसार ते 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार होते.पण तत्पूर्वीच नोव्हेंबर 2023 च्या पहिल्या आठवड्यात भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती साठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन लेखी परिक्षेत अजीज शेख यांनी बाजी मारली होती.शेख यांनी 281 अधिकाऱ्यांत 13 वा क्रमांक पटकावला होता.एकूण 20 अधिकारी दिल्ली येथे होणाऱ्या युपीएससी बोर्डच्या परीक्षेसाठी पात्र ठरले होते.

अजीज शेखांची राज्यभर चर्चा, सेवनिवृत्तीच्या तोंडावर आयएएसचे यश व मुदतवाढ
Ulhasnagar News: सेवनिवृत्तीला आठवडा बाकी असतानाच उल्हासनगर पालिका आयुक्त झाले आयएएस

त्यात अजीज शेख यांचाही समावेश होता.या परीक्षेचा निकाल 24 मे रोजी लागला.आणि त्यात उत्तीर्ण झालेले अजीज शेख यांची आयएएस म्हणून नियुक्ती झाली.

अजीज शेख हे आयएएस झाल्याचे आणि त्यांना दोन वर्षांची वर्षांची मुदतवाढ मिळाल्याने महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा आधिकारी संघटनेचे(पूर्वाश्रमीची मुख्याधिकारी संघटना)अध्यक्ष गणेश देशमुख,सरचिटणीस डॉ.प्रशांत रसाळ,कोषाध्यक्ष जमीर लेंगरेकर,माजी आयुक्त सुधाकर देशमुख,तसेच देविदास टेकाळे,विजयकुमार म्हसाळ,प्रशांत रोडे,तृप्ती सांडभोर,मंगेश चितळे,अश्विनी वाघमळे,भालचंद्र बेहरे अशा 35 अधिकाऱ्यांनी उल्हासनगरात येऊन अजीज शेख यांच्या चिकाटीचा सन्मान केला होता.

आयएएस झाल्याने अजीज शेख यांची बदली होणार काय अशी चर्चा रंगली असतानाच महाराष्ट्र शासनाने त्यांची उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त पदी कायम कायम ठेवले आहे.

अजीज शेखांची राज्यभर चर्चा, सेवनिवृत्तीच्या तोंडावर आयएएसचे यश व मुदतवाढ
Ulhasnagar News : उल्हासनगरातील 251 मतदान केंद्रावर 1255 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताबा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.