Ganpat Gaikwad Firing: उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्यामुळे राजकारण तापले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजप आमदारासह तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात कोर्टाने त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्याच गोळ्या झाडल्या होत्या. गणपत गायकवाड यांनी सहा गोळ्या फायर केल्या होत्या. ह्या सर्व गोळ्या महेश गायकवाड यांना लागल्या. महेश गायकवाड यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. (Crime News)
गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. गायकवाड तीन वेळा आमदार असून 2009 पासून सातत्याने निवडणूक जिंकत आहेत. गणपत गायकवाड हे दोन वेळा अपक्ष आमदार राहिले आहेत.
शिवसेना नेते महेश गायकवाड हे माजी नगरसेवक असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. महेश गायकवाड हे उल्हासनगर शिवसेनेचेही प्रमुख आहेत.
नेमकं काय घडलं?
कल्याण पूर्वेतील एका मालमत्तेच्या मालकी हक्कावरून भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यात वाद सुरू आहे. या मुद्द्यावर 31 जानेवारी रोजी दोन्ही पक्ष आमनेसामने आले होते. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही पक्ष शुक्रवारी संध्याकाळी उल्हासनगरमधील हिल लाइन पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पोहोचले होते. (Latest Marathi News)
दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा वाद झाला आणि वाद इतका वाढला की, भाजप आमदार महेश गायकवाड यांनी गोळीबार केला. या घटनेत महेश गायकवाड याना सहा गोळ्या लागल्या. तर एकजण जखमी झाले आहेत. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी भाजप आमदारासह तिघांना अटक केली आहे. दुसऱ्या पक्षाने आपल्या मुलासोबत गैरवर्तन केले, त्यामुळे त्यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा भाजप आमदाराने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.