उद्धवजी सोडून जाणाऱ्यांची मजबुरी समजून घ्या, पण जनता...; जयंत पाटील हे काय बोलले?

jayant Patil
jayant Patil
Updated on

नागपूर - महाविकास आघाडीच्या वतीने आज नागपूरमध्ये वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधीपक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.

jayant Patil
ऑर्थररोड जेलचा भत्ता खावून आलोय, आता कोणी मायचा लाल...; अनिल देशमुखांचं भाजपला आव्हान

जयंत पाटील म्हणाले की, विदर्भातील शेतकरी सरकारला विचारत आहेत की, मागच्या १० महिन्यात तुम्ही काय दिलं. महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर या सरकारने सर्व कामांना स्थगिती दिली. त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो, त्यानंतर कोर्टाने आदेश दिले की, स्टे उठवावा. मात्र सरकारने अजुनही त्यावरची स्थगिती उठवली नाही.

महाराष्ट्रातील तरुणांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम सरकारने केलं. उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला गेले. शेजारच्या राज्यातील मालक चिडले तर आपली खूर्ची धोक्या येईल, म्हणून उद्योग जावू दिले, असा आरोप पाटील यांनी केला.

jayant Patil
आम्ही राम-राम शब्दांनी धर्म-पथं जोडले अन् यांनी श्रीराम म्हणतं माणसं एकमेकांपासून तोडली; वडेट्टीवार बरसले

महाराष्ट्रातील तरुणांनी ५० खोक्यांवर गाणे सादर केले. त्या तरुणांना तुरुंगात टाकण्याचं काम सरकार करत आहे. काम करायच नाही, केवळ आपल्या विरोधात बोललं की, त्याला त्रास द्यायचा. यापलिकडे सरकारने काहीही केलं नाही. तसेच महापुरुषांचा अवमान करण्याचं काम सरकारने केल्याचं, पाटील म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी यांनी केली. त्यामुळे महाराष्ट्र आता वाट पाहतो की, निवडणुका कधी होतात. सरकारला धडकी भरली आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर मुंबईतील निवडणूक घेऊन दाखवावी, असं आव्हान पाटील यांनी दिला.

जयंत पाटील म्हणाले की, जे सोडून गेले त्यांना उद्धवजी गद्दार म्हणतात. पण मला उद्धवजींना सांगायचं की, कुछ तो मजबुरीया रही होगी...! काही तरी त्यांची अडचण असेल. त्यांना समजून घ्या. पण महाराष्ट्रातील जनता तुमच्या मागे ठामपणे उभे आहेत. शिवसैनिक तुमच्या पाठिशी आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.