UCC : ‘समान नागरी कायदा’ हे बाळासाहेबांचे स्वप्न - राहुल शेवाळे

राहुल शेवाळे : विधानसभेने केंद्राला ठराव पाठवावा
Uniform Civil Code is Balasaheb thackeray  dream  Rahul Shewale politics
Uniform Civil Code is Balasaheb thackeray dream Rahul Shewale politicsesakal
Updated on

मुंबई : ‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेल्या स्वप्नांपैकी सामान नागरी कायदा हे एक स्वप्न होते. मात्र, बाळासाहेबांशी रक्ताचे नाते सांगणारेच आज या कायद्याला विरोध करीत आहेत.

त्यामुळे त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे,’’ अशी टीका शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच राज्य विधानसभेने समान नागरी कायद्याला पाठिंबा देणारा ठराव करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणीही शेवाळे यांनी यावेळी केली.

अयोध्येत राम मंदिर उभारणे, ३७० कलम रद्द करणे आणि समान नागरी कायदा लागू करणे ही बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने होती.

Uniform Civil Code is Balasaheb thackeray  dream  Rahul Shewale politics
Balasaheb Thackeray: "हॅलो बाळासाहेब… शब्द देतो, तुम्हाला अपेक्षित असलेली शिवसेना आम्ही पुन्हा उभी करू"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन स्वप्ने आधीच पूर्ण केली आहेत. त्यानंतर आता देशात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत पाऊल उचलून बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलले आहे.

वास्तविक उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेला साजेशी भूमिका घेऊन त्यांच्या विचारांचे समर्थन करण्याची गरज होती.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असून, शिवसेनेचा समान नागरी कायद्याला बिनशर्त पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार धैर्यशील माने, हेमंत पाटील आदी उपस्थित होते.

Uniform Civil Code is Balasaheb thackeray  dream  Rahul Shewale politics
PM Modi on UCC : एका घरात दोन कायदे असतात का? समान नागरी कायद्यासाठी मोदींनी दिले बांगलादेशचे उदाहरण

कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही

या कायद्यामुळे हिंदूंना त्रास सहन करावा लागेल, असा प्रचार ठाकरे करीत आहेत. मात्र प्रत्यक्षात हा कायदा हिंदूंना प्रभावित करणार नाही, तर फक्त गांधी कुटुंबाला प्रभावित करणारा ठरेल. त्यामुळे उद्धव ठाकरे या कायद्याला विरोध करीत आहेत, अशी टीका शेवाळे यांनी केली. हा कायदा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून प्रत्येकाला त्यांची ओळख विचारात न घेता समान वागणूक देईल, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.