कोरोना काळात झालेल्या कामासंदर्भात शिंदे-फडणवीस सरकार तत्कालीन ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. सत्ताधाऱ्यांनी ठाकरे परिवाराला देखील घेरले आहे. मात्र केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी उद्धव ठाकरे सरकारचे कौतुक केले आहे. त्यामुळे राज्यातील भाजप नेते तोंडावार आपटले आहेत.
ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली जात असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोना काळात राज्यात चांगलं काम झाल्याचं सांगत कोरोना काळातील कामाचे कौतुक केलं आहे. त्यावेळी ठाकरे सरकार सत्तेत होते, हा प्रश्न उपस्थित करताच आरोग्यमंत्री म्हणाले, कोरोना काळातील कामावर कुठल्याही प्रकारे मला राजकारण करायच नाही.
जर यामध्ये कुठलं चुकीचं काम झालं असेल तर या संदर्भात कारवाई व्हायला हवी, असे सुद्धा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख मांडवीया हे आयुष्यमान भारत योजनेत संदर्भात बोलत असल्याचे सांगत सारवासारव केली.
कोरोना काळात झालेल्या गैरप्रकारांची ईडीच्या वतीने चौकशी करण्यात येत आहे. ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या लोकांच्या घरी ईडीचे अधिकारी कालपासून चौकशा करत आहेत. त्यातच आज ईडीचे अधिकारी भायखळ्यातील महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खाते विभाग कार्यालयात देखील गेले होते.
ईडी अधिकाऱ्यांच्या सोबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारीही सोबत असून कोविड घोटाळा प्रकरणाती ईडीचे धाडसत्र सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्याकडून पालिका अधिकाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.