"राज्य सरकारने राजकारण बाजूला ठेवून सहकार क्षेत्राकडे पाहावं"

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
Home Minister Amit Shah
Home Minister Amit Shahesakal
Updated on

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज प्रवरानगर येथे राज्यातील पहिली सहकार परिषद (Sahakar Parishad Pravaranagar) पार पडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांसारखे भाजपचे मोठे नेते उपस्थित होते. पहिले सहकारमंत्री अमित शहा यांनी अहमदनगरच्या प्रवरानगरमध्ये बोलताना ही भूमी सहकार क्षेत्राची काशी असल्याचं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि साई बाबांना वंदन करुन आपल्या भाषणाला सुरुवात केली. याचं श्रेय त्यांनी विखे पद्मश्री विखे पाटलांना दिलं. अमित शहा (Amit Shah) यांनी सहकार क्षेत्रासाठी महाराष्ट्राने दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली. 'सहकार क्षेत्राचा पाया रचण्याचं काम पद्मश्री विखे पाटलांनी केलं. (Padmashree Vikhe Patil) मोठ्या अडचणींचा सामना करत त्यांनी ही काम केलं, त्यामुळे प्रत्येकांनं ही माती आपल्या कपाळाला लावली पाहिजे' असं ते म्हणाले. (Amit Shah in Shirdi)

Home Minister Amit Shah
साखर उद्योगाबाबत फडणवीस आज अमित शहा यांच्याशी चर्चा करणार

सहकार आंदोलन अडचणीत असल्याचं अनेजण म्हणाले, त्यासाठीच हे खातं तयार केल्याचं यावेळी अमित शहांनी सांगितलं. ७५ वर्षात कोणीही याचा विचार केला नव्हता. मात्र नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ते केलं असं अमित शहा म्हणाले. सहकार क्षेत्राची परिस्थिती अशी का झाली याचा विचार करायला हवा असंही ते म्हणाले. सुरुवातीला महाराष्ट्राच्या सहकारी बँकांची (CoOperative Banks in Maharashtra) देशात चर्चा होती, मात्र नंतर त्यांची परिस्थिती काय झाली? त्यामध्ये घोटाळे कुणी केले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच राज्य सरकारने राजकारण बाजूला ठेवून सहकार क्षेत्राकडे पाहावं अशी टीका देखील त्यांनी केली.

सहकार मंत्रालयाची स्थापना झाली तेव्हा अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, त्यांना मी उत्तर देऊ इच्छितो. देशातील ३१ टक्के साखरेचं उत्पादन सहकारी क्षेत्रातून होते. १३ टक्के गहू, २० टक्के तांदूळ, लिज्जत पापड, अमूल सारख्या अनेक सहकारी संस्था चांगलं काम करताय असं म्हणत त्यांनी या क्षेत्राचं महत्व सांगितलं.

Home Minister Amit Shah
Income Tax चा छापा झाला, आता ED आणि CBI पण छापा मारेल; नेत्याने केले मोठं विधान

सहकार क्षेत्राच्या या आंदोलनाला आम्ही पुढे घेऊन जाऊ इच्छितो, त्यामुळे येणाऱ्या काळात या क्षेत्राला काहीही मदत लागली तर नरेंद्र मोदी सरकार ती मदत देईल असं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच आता पर्यंत साखर उत्पादनासाठी सरकारने केलेल्या मदतीबद्दल देखील त्यांनी माहिती दिली आहे. तसेच येणाऱ्या काळात सरकार साखर कारखान्यांचे सर्व प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.

Home Minister Amit Shah
संधी मिळाली तर प्रशांत किशोर 'या' मुख्यमंत्र्यांसोबत काम करणार

गुजरातमध्ये अमुलच्या माध्यमातून ३६ लाख महिला आपला उदर्निवाह करत आहे, हा सुद्धा सहकाराचा परिणाम असल्याचं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.