Amit Shah Pune Visit : गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर; शहरातील 'हे' रस्ते असणार बंद, प्रेक्षकगृहाला छावणीचं स्वरुप

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहांचं काल पुण्यात झालं आगमन
Amit Shah Pune Visit
Amit Shah Pune Visit esakal
Updated on
Summary

पुण्यात आल्यावर शहा यांनी रात्री मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या. रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या.

Amit Shah Pune Visit : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहांचं (Union Home Minister Amit Shah) काल पुण्यात आगमन झालं असून, शहा यांच्या पुणे दौऱ्याकडं राज्याचं लक्ष लागलंय. काल रात्री शहांचा मुक्काम तारांकित हॉटेलमध्ये होता.

दरम्यान, अमित शहा यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी लोहगाव विमानतळावर उपस्थित होते.

Amit Shah Pune Visit
Rahul Gandhi यांचा संसदेत परतण्याचा मार्ग मोकळा; लोकसभेत मोदी सरकार विरूद्धच्या 'अविश्वासदर्शक' ठरावात घेणार भाग?

पुण्यात आल्यावर शहा यांनी रात्री मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या. रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. आज बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

त्याअनुषंगानं प्रेक्षकगृह परिसरात छावणीचं स्वरूप आलंय. पुण्यातील पंचतारांकित हॉटेल ते पिंपरीतील रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृह दरम्यान ताफ्याची रंगीत तालीमही काल पार पडलीये. शहांच्या स्वागतासाठी पुण्यातील सेनापती बापट रोड ते ब्रेमेन चौकापर्यंत महायुतीच्या सरकारचे झेंडे लावण्यात आले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे झेंडे अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यांच्या या कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आलीये.

Amit Shah Pune Visit
Maharashtra Live Blog Updates : हैदराबाद विमानतळावर जवळपास २ कोटींचं सोनं जप्त, अंतर्वस्त्रात लपवून आणण्याचा प्रयत्न

असा असणार वाहतुकीत बदल

महावीर चौक : महावीर चौकाकडून चिंचवडकडं जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलीये. त्यामुळं पर्यायी मार्गावरून ही वाहनं महावीर चौकाकडून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील.

दर्शन हॉल लिंक रोड : लिंकरोडकडून अहिंसा चौकाकडं येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग : ही वाहने मोरया हॉस्पिटल चौकाकडून इच्छित स्थळी जातील.

रिव्हर व्ह्यू चौक : अहिंसा चौक बाजूकडं जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली असून ही वाहने या चौकाकडून वाल्हेकरवाडी, बिजलीनगरमार्गे इच्छित स्थळी जातील.

हा सर्व बदल रविवारी (आज ता. 6) सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत असणार आहे, असे पोलिस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.