Ajit Pawar: 'भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणे हे हास्यास्पद', केंद्रीय मंत्र्याचा अजित पवारांना टोला

मुख्यमंत्री पदाच्या चढा-ओढीतून भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणे हे हास्यास्पद असल्याची टीका
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदाबाबत वेगवेगळी वक्तव्य केली जात आहेत. अजित पवारांनी तर 2024 नाही आताच मुख्यमंत्रिपदावर दावा असल्याचं सांगितलं आहे. यानंतर अजित पवारांचे ठिकठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरही लागले आहेत त्यावर सत्ताधारी विरोधक सर्वजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी खोचक टीका देखील केली आहे.

या पोस्टर प्रकरणावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्यांनी येथे राज्याचं मुख्यमंत्री कोणाला व्हावं असं वाटणार नाही. मला ही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं असं आठवले यांनी म्हंटलं आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या चढा- ओढीवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मुख्यमंत्री पदाच्या चढा-ओढीतून भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणे हे हास्यास्पद असल्याची टीका ही मंत्री आठवले यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

Ajit Pawar
Ajit Pawar: बैलासमोर नाचल्याच्या व्हिडिओवर अजित पवार म्हणतात, "गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाहीतर…"

बॅनरवर अजित पवार यांची प्रतिक्रिया

धारशिव येथील अजित पवारांच्या सासुरवाडीत ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर्स लावण्यात आले होते. यावरूनही अजित पवारांनी फटकारलं आहे. “असे बॅनर्स कोणी लावू नये. बॅनर्स लावून कोणीही मुख्यमंत्री बनत नसतं. त्यासाठी १४५ चे बहुमत लागते. एकनाथ शिंदेंनी वेगवेगळ्या कृल्प्त्या वापरून बहुमत मिळवलं. कोणालाच वाटलं नव्हतं ते मुख्यमंत्री बनतील. सासुरवाडीत माझ्यावर प्रेम उतू चाललंय. पण, सहकाऱ्यांना आवाहन करतो की, हा अतिशय चुकीचा आग्रह आहे. आपआपलं काम करा.

आमदारांची संख्या वाढवा, तुमच्या विचारांचे आमदार निवडून आले, वरिष्ठांचे आशीर्वाद लाभले आणि आमदारांनी पाठिंबा दिला तर होऊ शकतं,” असेही अजित पवारांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar
Jitendra Awhad: “निरंजन डावखरेंनी मुस्लीम भगिनीशी…”, लव्ह जिहादच्या बॅनरवरून आव्हाडांची प्रतिक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()