केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राणेंच्या वक्तव्यावरुन शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राणेंच्या वक्तव्यावरुन शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नारायण राणे यांच्याविरोधात राज्यात अनेक ठिकाणी पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. नाशिक पोलीस राणेंना अटक करण्याची शक्यता आहे. अशात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी नारायण राणेंना इशारा दिला आहे. पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही धडा शिकवू, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते एका मराठी माध्यमाशी बोलत बोते.
हे बेताल वक्तव्य म्हणणार नाही, पण याला माजलेलं वक्तव्य म्हणता येईल. महिन्याआधी मंत्री पदावर बसलेल्या राणेंना माज आल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षाने त्यांना केवळ भुंकण्यासाठी याठिकाणी सोडलं आहे. पण, माझा कोंबडी चोराला इशारा आहे, मुख्यमंत्र्यांना कानशिलात देण्याची भाषा करता. या पुढे जर असं वक्तव्य केलं तर घरात घुसून तुमचा हिशोब चुक्ता करु. पोलिसांनी कारवाई केली नाही, तर आम्ही जे बोललोय ते करुन दाखवू. तुम्ही मुख्यमंत्र्याना काही करु शकत नाही. आम्ही कोकणात येऊन शिवसेना काय असते हे दाखवू. बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलमध्ये उत्तर देऊन तुमचा माज उतरवू, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.
दरम्यान, अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. हा नक्की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे की हिरक महोत्सव असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यांनतर त्यांनी याबाबत मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा विचारणा केली. त्यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन असल्याचं सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं. यामुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो तर कानाखालीच वाजवली असती, असं राणे म्हणाले. यानंतर राज्याचे राजकीय वातावरण तप्त झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.