सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र परीक्षा ६ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे नियोजित होते. पण, सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने ही परीक्षा आता २६ नोव्हेंबरपासून घेण्याचे विद्यापीठाने निश्चित केले आहे.
विद्यापीठाअंतर्गत १०८ उच्च महाविद्यालयांसह विद्यापीठातील विविध संकुलातील ६५ ते ७० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. परीक्षेवेळी प्रत्येक केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. ही परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी प्रथम वर्षातील विद्यार्थी वगळून उर्वरित सर्वच विद्यार्थ्यांसाठी सरमिसळ पद्धत अवलंबली जाणार आहे. त्यामुळे एकाच महाविद्यालयातील विद्यार्थी एकाच परीक्षा केंद्रांवर नसतील.
दरम्यान, परीक्षेला विलंब झाल्याने पेपर झाल्यावर लगेचच उत्तरपत्रिकांची तपासणी उरकली जाणार आहे. परीक्षेनंतर अवघ्या २५ ते ३० दिवसांत निकाल जाहीर होईल, यादृष्टीने विद्यापीठाने नियोजन केले आहे. विद्यापीठाच्या नवीन निर्णयानुसार परीक्षार्थींना आता परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी २० दिवस जादा मिळणार असून या काळात विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
निवडणुकीमुळे वेळापत्रकात थोडासा बदल
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षा २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. विधानसभा निवडणुकीमुळे परीक्षेच्या वेळापत्रकात थोडासा बदल करण्यात आला आहे. सुरवातीला पारंपारिक अभ्यासक्रमांची परीक्षा सुरू होईल आणि पुढील १०-१२ दिवसांनी अभियांत्रिकी, फार्मसीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होईल.
- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात...
संलग्नित महाविद्यालये
१०९
प्रवेशित विद्यार्थी
६५ ते ७० हजार
‘पारंपारिक’ची परीक्षा
२६ नोव्हेंबर ते १० जानेवारी
‘व्यावसायिक’ची परीक्षा
१० जानेवारी ते २९ फेब्रुवारी
‘व्यावसायिक’ची पेपर तपासणी ऑनस्क्रिन
अभियांत्रिकी, फार्मसी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पेपर (उत्तरपत्रिका) ऑनस्क्रिन पद्धतीनेच तपासले जाणार आहेत. दुसरीकडे पारंपारिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे पेपर ऑफलाइन पद्धतीने तपासले जाणार आहेत. दरम्यान, पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्याच महाविद्यालयात होणार आहे. पण, परीक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून विद्यापीठाकडून भरारी पथके देखील नेमली जाणार आहेत. परीक्षेवेळी ही पथके अचानकपणे परीक्षा केंद्रांना भेटी देतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.