Kirit Somaiya: व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत किरीट सोमय्यांकडे ५० लाखांची मागणी; गुन्हा दाखल

किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात एक मेल आला असून त्यामध्ये अज्ञाताने सोमय्यांना कथित अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आहे
bjp leader Kirit Somaiya
bjp leader Kirit Somaiya esakal
Updated on

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपुर्वी यांचा कथित व्हिडीओ प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. त्याचबरोबर किरीट सोमय्या यांच्याकडे तब्बल 50 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान या याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

त्याचबरोबर आरोपीने किरीट सोमय्यांचा कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे तब्बल 50 लाखांची खंडणी मागितल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात एक मेल आला होता. त्यामध्ये अज्ञाताने सोमय्यांना त्यांचा कथित अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

'50 लाख रुपये द्या अन्यथा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल करेन', अशी धमकी किरीट सोमय्यांना मेलवरुन देण्यात आली आहे.

bjp leader Kirit Somaiya
Chandrashekhar Bawankule: 'बातम्या एकतर्फी जाईल असं मी...', व्हायरल ऑडिओ क्लिपवर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांचा एक अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओनंतर हे प्रकरण विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आधिवेशनात चर्चेत आले होते. हाच कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, अज्ञात आरोपीने दिली आहे. याप्रकरणी किरीट सोमय्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.

किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 385 अन्वये नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bjp leader Kirit Somaiya
Honey Bee Attack: अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांवर मधमाशांचा हल्ला, 200 जण जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.