Unmesh Patil Join Shivsena UBT: अखेर उन्मेष पाटलांनी बांधलं शिवबंधन! जळगावमध्ये भाजपला ठाकरेचा दणका

Unmesh Patil Join Shivsena UBT: भाजपने तिकीट कापलेले जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील काल मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व पाठोपाठ उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
Unmesh Patil Join Shivsena UBT
Unmesh Patil Join Shivsena UBTEsakal
Updated on

जळगाव: भारतीय जनता पक्षाने तिकीट कापलेले जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी मंगळवारी मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व पाठोपाठ उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांनी आज ‘मातोश्री’वर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

उन्मेष पाटील यांच्याबरोबर त्यांचे मित्र व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे. लोकसभा उमेदवारीसाठी करण पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर जळगावमधून उन्मेष पाटलांना ठाकरे गट उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Unmesh Patil Join Shivsena UBT
Uday Samant: रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेचीच! उदय सामंतांनी सांगितलं ट्विट करण्यामागचं कारण म्हणाले, 'CM शिंदेंना...'

यावेळी बोलताना उन्मेष पाटील म्हणाले माझी लढाई आत्मसन्मानासाठी आहे. अवहेलना झाल्यामुळे मी वेगळी भूमिका घेतली आहे. मी केलेल्या विकासाची भाजपला किंमत नाही. बदल्याचं राजकारण मनाला वेदना देणारं होतं. उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

पुढे बोलताना उन्मेष पाटील म्हणाले की, ही पदाची, जय-विजयाची लढाई नाही तर ही स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची लढाई आहे. खानदेशाच्या विकासाच्या बाजूने पुढे नेणार लढाई आहे. मला उमेदवारी मिळालेली नाही म्हणून ही भूमिका घेतलेली नाही . पण राजकारणात काम करताना मान सन्मान नको , पद नको, पण त्याचा स्वाभिमान सांभाळला जा नसेल अवहेलन केली जात असेल तर लाचार होऊन राजकारण करणं योग्य नाही. भाजपमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली नाही, अवहेलना होत असल्यानं वेगळी भूमिका घेतली असे उन्मेष पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

बावनकुळेंकडून संपर्क

दरम्यान, मंगळवारी मुंबईत या घडामोडी घडत असताना, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उन्मेष पाटलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पाटील यांना समजाविण्याचे प्रयत्न सुरू असून, ते भाजप सोडणार नाही, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

Unmesh Patil Join Shivsena UBT
Fadnavis Attack on Pawar: महात्मा गांधींच्या वर्ध्यातून पंजा हद्दपार...; फडणवीसांनी मानले शरद पवारांचे आभार

अशी असू शकतील समीकरणे

उन्मेष पाटील करण पवारांच्या मागे पूर्ण ताकद उभी करतील

भाजपतील नाराजांची मोट बांधून त्यांची मदत घेतील

उन्मेष पाटलांच्या पाठबळाने भाजप उमेदवार स्मिता वाघांना तुल्यबळ लढत देता येईल

उन्मेष पाटील स्वत: चाळीसगाव विधानसभेसाठी ‘कमिटमेंट’ घेतील

Unmesh Patil Join Shivsena UBT
Unmesh Patil With Shivsena UBT: उन्मेश पाटील, करण पवारांच्या पक्षांतराबद्दल भाजप नेते अनभिज्ञ! महाजन म्हणतात, ‘ते आपल्या संपर्कात नाहीत’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.