Unseasonal Rains:‘आधी मदत द्या, नंतर करा भाषण’ !पीडित शेतकऱ्यांचा नेत्यांना खोचक सल्ला; अवकाळीमुळे नुकसान

तिखट मिरचीची कडू कहाणी ! अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट, मिरची तोडणेही झाले महाग
Unseasonal Rains:‘आधी मदत द्या, नंतर करा भाषण’ !पीडित शेतकऱ्यांचा नेत्यांना खोचक सल्ला; अवकाळीमुळे नुकसान
esakal
Updated on

Unseasonal Rains in Maharashtra: नागपूर जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने आणि नेत्यांनी आधी मदत करावी नंतर भाषणे करावी, असा रोचक सल्ला पीडित शेतकऱ्यांनी दिला आहे. जिल्ह्यात शेकडो एकरात पिकाचे नुकसान झाले असून सरकार फक्त पंचनाम्याचे शेतकऱ्यांना आश्वासन देत आहे. यामुळे त्यांच्या रोष आहे.

धानपीक भुईसपाट

कन्हान : मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परिसरातील कापून ठेवलेले धानपीक पाण्यात सडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हाताशी व तोंडाशी आलेला घास म्हणजे धान पीक वाया गेले. धानपीक असलेल्या बांधानात पाणी जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. तातडीने सर्वे करून शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कन्हान परिसरातील खेडी, खोपडी, गहू हिवरा, बोरी, बोरडा, निमखेडा, तेलनखेडी, साटक, केरडी, नांदगाव, एंसबा, वाघोली, वराडा, टेकाडी, पिपरी, कांद्री, खंडाळा, बोरी, निलज, सिंगारदीपच्या शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले धानपीक पावसामुळे नष्ट झाले.(Latest Marathi News)

Unseasonal Rains:‘आधी मदत द्या, नंतर करा भाषण’ !पीडित शेतकऱ्यांचा नेत्यांना खोचक सल्ला; अवकाळीमुळे नुकसान
Raj Thackeray : इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावा, अन्यथा परिणाम भोगा; मनसेने दिला आठ दिवसांचा अल्टिमेटम

शासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी देवराव इंगळे, मंगेश बालगोठे, स्वप्नील बोरकुटे, रामभाऊ कोमठी, मंगेश कडू, रामू चौधरी, गजानन काळे, अनिल उके, राजू कामळी, लक्ष्मण खंडार, आत्माराम उकुंडे, प्रकाश काठोके, रामभाऊ ठाकरे, सुनील जामदार, दिगंबर ठाकरे, लक्ष्मीकांत काकडे, सचिन हुड, रवींद्र चकोले, प्रेमदास धरमारे, विष्णू कुथे या शेतकऱ्यांनी केली आहे.

धान, कापसाला फटका, धुके पडल्यास मिरचीला धोका

कोदामेंढी (मौदा) : हाती आलेल्या पिकाला भाव नाही, रोगराई, निसर्गाची अवकृपा, विजेचा तांडव, वातावरणातील बदल, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, कर्जाचा डोंगर, शासनाचे निकष आदींसह या ना त्या कचाट्यात शेतकरी घुसमटत असतो. शेतकऱ्यांच्या नशिबी अठरा विश्व दारिद्र्य जणू पाचवीला पूजल्यागत झाले आहे. आज सकाळपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा फटका तालुक्यात धान आणि कापूस पिकाला बसला. (Latest Marathi News)

Unseasonal Rains:‘आधी मदत द्या, नंतर करा भाषण’ !पीडित शेतकऱ्यांचा नेत्यांना खोचक सल्ला; अवकाळीमुळे नुकसान
Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

ऐन हिवाळ्यात थंडीची चाहूल लागली आणि अवकाळी पावसाचे आगमन झाले. यामुळे शेतपिकाचे होत्याचे नव्हते झाले. तालुक्यात खरीप हंगामात ३८ हजार हेक्टर आर. क्षेत्रफळाखाली धान पिकाचे तर ३ हजार ५०० हेक्टर आर. क्षेत्रफळाखाली कापूस पिकाची लागवड करण्यात आली. दिवाळीनंतर धान कापणीला वेग आला. काहींनी हारवेस्टरच्या साहाय्याने धान काढून घेतले असले तरी बऱ्याच कास्तकारांनी मजुरांच्या साहाय्याने धानाची कापणी केली आहे. धानाची कापणी झाल्यानंतर पुंजके शेतात असताना अवकाळी पावसाचा प्रकोप झाला. बांध्यात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात धानपिकाचे नुकसान झाले.

यंदा धानाची फसल चांगली असून धानाला भाव देखील चांगला असल्याचे बोलल्या जात आहे. आणि त्यातच धान खरेदी केंद्रात नोंदणी केल्यास शासनाकडून हेक्टरी १५ हजार बोनस मिळणार आहे. मात्र अवकाळी पावसाचा मारा झाल्याने धानाचे नुकसान झाले. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी मेटकुटीस आला आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांचा शेतातील कापूस वेचणीला आलेला होता. मात्र अवकाळी पावसामुळे कापसाचे ओले पडल्याने हातचे पीक गेल्याची कैफियत शेतकरी मांडू लागले आहेत. एकतर कापसाला भाव नाही. कापूस वेचायला मजूर मिळेनासे झाले आणि मिळालेच तर परवडण्यासारखे नाही त्यातच करावी लागत असलेली फवारणी यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्यागत झाले आहे.(Latest Marathi News)

Unseasonal Rains:‘आधी मदत द्या, नंतर करा भाषण’ !पीडित शेतकऱ्यांचा नेत्यांना खोचक सल्ला; अवकाळीमुळे नुकसान
Raj Thackeray : इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावा, अन्यथा परिणाम भोगा; मनसेने दिला आठ दिवसांचा अल्टिमेटम

तिखट मिरचीची कडू कहाणी

मिरचीला भाव नाही. तेही तोडणे महाग झाले आहे. त्यातच अवकाळी पावसाचा कहर. वातावरणात उघाड झाल्यास सोयीचे होईल. मात्र थंडीचा मोसम असल्याने धुआर पडल्यास मिरची पिकाला धोका उद्‍भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिखट मिरचीची कडू कहाणी अशी नौबत मिरची उत्पादक शेतकऱ्याची झाली आहे.

नुकसान भरपाईची अपेक्षा

शासनाने मोठा गाजावाजा करीत एक रुपयात पीकविमा उतरविण्याची घोषणा केली. बहुतांश शेतकऱ्यांनी विमा काढला. मात्र आजपावेतो बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नसल्याचे शेतकरी सांगतात. आता मोठ्या थाटात आणि वाजत गाजत एक रुपयात विमा उतरविण्याचा गाजर शासनाने दाखविला असल्याने आता नुकसानीचा मोबदला मिळाल्याशिवाय गाजर खाल्ल्यागत वाटणार नाही. अवकाळी पावसाचा मारा हाती आलेल्या शेतपिकावर झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी या अपेक्षेत शेतकरी आहेत. (Latest Marathi News)

Unseasonal Rains:‘आधी मदत द्या, नंतर करा भाषण’ !पीडित शेतकऱ्यांचा नेत्यांना खोचक सल्ला; अवकाळीमुळे नुकसान
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेल्या हेमंत पाटलांना राष्ट्रपतींकडून समन्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()