ऐन दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता; हवामानचा इशारा

किनारपट्टीवरील नागरिकांना प्रशासनाने सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
rain
rainesakal
Updated on
Summary

किनारपट्टीवरील नागरिकांना प्रशासनाने सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

चार दिवसांपूर्वी म्हणजेच २५ ऑक्टोबरला संपूर्ण देशातून यंदाचा मान्सुनने माघार घेतली असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर केलं होत. दरम्यान आज पुन्हा ४ ते १० नोब्हेंबर या कालावधीत पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत एक कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे. हा कमी दाबाचा पट्टा तीव्रतेने पश्चिम दिशेने सरकला असल्याने पश्चिम किनारपट्टीवर पावसाच्या शक्यतेची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

rain
ST कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये; अनिल परबांचे आवाहन

दरम्यान, ६ ते ११ नोव्हेंबर यादरम्यान याचा परिणाम दिसून येणार आहे. म्हणून ईशान्य मौसमी पाऊस दक्षिण भारतात सक्रिय असणार आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना प्रशासनाने सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. यासोबत २९ ऑक्टोबरपासून येत्या 5 दिवसांसाठी भारतीय हवामान खात्याने गंभीर हवामानाचा इशाराही दिला आहे.

यंदा जुनच्या पहिल्याच आठवड्यात केरळमध्ये पावसाने दमदार एंट्री केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तो उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यांकडे सरकला. दरम्यान यंदा मान्सून सामान्य राहणार असून पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. यानुसार राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला आहे.

rain
22 आमदार लपवलेले, यंत्रणेला वासही लागू दिला नव्हता - राणे

दरम्यान देशात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारतातील काही भागांतून 6 ऑक्टोबरला सुरू झाला. परतीच्या पावसाने राज्यातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला झोडपून काढले. या प्रदेशातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसाच्या परतीच्या प्रवासात महाराष्ट्रासह उत्तरेकडील काही राज्यांनाही जबरदस्त तडाखा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()