गेल्या काही दिवसांपासून आयएएस अधिकारी पूजा खेडकर या चांगल्याच चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या गैरव्यवहारांची सध्या जोरदार चर्चा सुरू असतानाच आथा UPSC ने प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर विरुद्ध बनावट ओळख सादर केल्याबद्दल FIR दाखल केली आहे, तसेच पूजा खेडकर यांचं आयएएस केडर रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देखील देण्यात आली आहे.
UPSC ने, पोलिस अधिकाऱ्यांकडे FIR दाखल करून फौजदारी खटल्यासह तिच्याविरुद्ध अनेक प्रकरणात कारवाई सुरू केली आहे. यासोबतच नागरी सेवा परीक्षा-2022 च्या नियमांनुसार पूजा खेडकर यांची नागरी सेवा परीक्षा-2022 ची उमेदवारी रद्द करण्यासाठी/ भविष्यातील परीक्षांमधून काढून टाकण्याबाबत कारणे दाखवा नोटीस (SCN) जारी केली आहे.
UPSC ने नागरी सेवा परीक्षा 2022 साठी तात्पुरती शिफारस केलेली उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिच्या गैरवर्तनाचा तपशीलवार आणि सखोल तपास केला. या तपासणीतून हे उघड झाले आहे की तिचे नाव, तिच्या वडिलांचे आणि आईचे नाव, तिचे छायाचित्र/स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून तिची ओळख बदलून फसवणूक केली.
पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण तीन जून २०२४ पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण सुरू झाले होते. पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावत महाराष्ट्र शासन असे लिहिले होते. याबाबत वाद झाल्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांची तत्काळ वाशीम येथे बदली झाली होती. वाशीममध्ये दोन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी होता; मात्र आता यावर स्थगिती देण्यात आली होती.
खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरणे यामुळे प्रशिक्षणावर असलेल्या पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप झाला, त्याबाबत चौकशी सुरू होती. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली होती.
पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याचा आरोप आहे. तसेच त्यांची आणि त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची संपत्ती असतानाही त्यांनी नॉन क्रिमी लेअरचे प्रमाणपत्र काढल्याचे समोर आले होते. खेडकर यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून सुरूवातीला दोन दिव्यांग प्रमाणपत्र काढली होती. नंतर त्या दोन्ही अपंग प्रमाणपत्रांचे एकत्रिकरण करून एकच प्रमाणपत्र देण्यात आले असून त्यामध्ये पूजा खेडकर या ५१ टक्के अपंग असल्याचे नमूद करण्यात आले असल्याचीही माहिती देखील समोर आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.