Uran Murder Case: "अनेक राजकीय नेते भेटून गेले पण..." यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी घडामोड, कुटुंबीयांनी कोणाकडे मागितली मदत?

Uran Murder Case Updates: यशश्री शिंदे तिच्या कुटुंबीयांसह उरण शहरात राहत होती. घरापासून 25 किलोमीटर अंतरावर बेलापूर येथील एका खासगी कंपनीत ती काम करायची.
Uran Murder Case Updates
Uran Murder Case UpdatesEsakal
Updated on

उरण येथे काही दिवसांपूर्वी यशश्री शिंदे या 20 वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने हत्या केली होती. त्यामुळे राज्यात संतापाची लाट निर्माण झाली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावरील कायदेशीर कारवाईला सुरूवात झाली आहे.

अशात आता पीडीता यशश्री शिंदेच्या कुटुंबीयांनी वकील असीम सरोदे यांना पत्र लिहित त्यांना या प्रकरणात कायदेशीर मतद करावी अशी मागणी केली आहे.

यशश्रीच्या कुटुंबीयांनी लिहिलेल्या पत्रात काय?

यशश्री शिंदेच्या कुटुंबीयांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "उरणमध्ये आमच्या मुलीची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या झाली. अनेक राजकीय नेते भेट देऊन गेले. काहीजणांनी इथे प्रक्षोभक भाषणे केली. धर्मावर आधारित द्वेष पसरवितांना काही राजकीय नेत्यांना आम्ही बघतो आणि वाईट वाटते."

या पत्रात पुढे लिहिले आहे की, "परंतु तुम्ही आलात तेव्हा वेगळेपण जाणवले की, आम्हाला खरोखर मदत करण्याचा तुमचा उद्देश आहे. तुमच्या बोलण्यातील संतुलितपणा व साधेपणा बघून आम्हाला विश्वास आहे की, न्यायाच्या दिशेने तुम्ही काम करता. अन्यायग्रस्त लोकांच्या भावना समजून घेणारा मानवीदृष्टीकोण तुमच्याकडे आहे. तुम्ही व तुमच्या टीमने आमची केस घ्यावी आणि आम्हाला सगळी कायदेशीर मदत करावी अशी आमच्या परिवाराची इच्छा आहे.

दरम्यान पीडिता यशश्री शिंदेच्या कुटुंबियांनी लिहिलेल्या पत्राला प्रतिसाद देत असीम सरोदे यांनी त्यांना कायदेशीर मदत करायला तयार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, "मी व आमची लॉ टीम यशश्री शिंदेच्या कुटुंबियांना कायदेशीर मदत व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घ्यायला तयार आहोत. त्यांनी आमच्यावर विश्वास दाखविला ही आमच्या कामाची पावती आहे.

Uran Murder Case Updates
Chinmayi Sripada: सैराटमधील गायिकेचा पद्मश्री विजेत्याकडून छळ, चिन्मयीच्या पोस्टमुळे फिल्म इंडस्ट्रीत खळबळ

काय आहे यशश्री शिंदे हत्या प्रकरण?

यशश्री शिंदे तिच्या कुटुंबीयांसह उरण शहरात राहत होती. घरापासून 25 किलोमीटर अंतरावर बेलापूर येथील एका खासगी कंपनीत ती काम करायची. बी.कॉम ची पदवीधर असलेल्या यशश्रीची हत्या तिचा कथित प्रियकर दाऊद शेख याने केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. तो घटनेनंतर तो कर्नाटकात पळून गेला होता.

शवविच्छेदन अहवालात पीडित मुलीवर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मारेकऱ्याने चाकूने अनेक वार करून तिची हत्या केली होती. नंतर काही कुत्र्यांनी पीडितेच्या मृतदेहाचे लचके तोडले होते. शरीराचे काही भाग प्राण्यांनी खाल्ल्याचेही समोर आले होते. यशश्रीच्या चेहऱ्यावर, शरीरावर आणि प्रायव्हेट भागावर जखमा होत्या.

Uran Murder Case Updates
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत पतीने पत्नीचा 30 वेळा अर्ज भरला अन् 26 वेळा पैसे मिळवले; नेमकं प्रकरण काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.