बारामती शहर - हेल्मेटचा वापर आपल्या सुरक्षिततेसाठी असतो, तो वापरण्यात कमीपणा कसला वाटतो, असा सवाल करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेल्मेटचा वापर गरजेचाच असल्याचे सांगितले.
तिसाव्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, उपसभापती शारदा खराडे, गटनेते सचिन सातव, संभाजी होळकर, इम्तियाज शिकीलकर उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘रस्त्यावर चालताना शॉर्टकटचा प्रयत्न केला तर आयुष्य एका क्षणात संपू शकते. त्यामुळे अतिघाई व नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. नियम पाळण्याची सुरवात प्रत्येकाने स्वतःपासून केली, तर अपघात होण्याची शक्यता मावळते. अपघातातील जखमींना मदत करून त्यांचा जीव वाचविणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.’’ उपप्रादेशिक परिवहन
अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी प्रास्ताविकात रस्ता सुरक्षा सप्ताहाचा आढावा घेतला. या प्रसंगी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त नियमांची माहिती देणाऱ्या पत्रकाचे प्रकाशन पवार यांनी केले.
भविष्यात आमचे सरकार आले, तर दारू पिऊन गाडी चालविताना जो वाहनचालक सापडेल त्याचा वाहन चालविण्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत कायदाच करू. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद हवी. - अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.