राजकीय हत्यार म्हणून इडी, आयटीचा वापर; रोहित पवारांचा वार

Rohit Pawar
Rohit PawarRohit Pawar
Updated on

पुसद (जि. यवतमाळ) : सध्या महाराष्ट्रात ईडी, आयटी, एनसीबी या सारख्या स्वायत्त संस्थांचा केंद्र सरकार राजकीय हत्यार म्हणून वापर करीत आहे, असा आरोप जामखेडचे युवा आमदार रोहित पवार यांनी सोमवारी (ता. १८) पुसद येथे केली. आमदार रोहित पवार हे पुसद येथे आमदार इंद्रनील नाईक व ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी नाईक बंगल्यावर पत्रकारांसोबत बोलत होते. यावेळी माजीमंत्री मनोहर नाईक, आमदार इंद्रनील नाईक, नगराध्यक्ष अनिता नाईक, ययाती नाईक उपस्थित होते.

ईडी, आयटीचा प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरूद्धही करण्यात आला. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी व लोकांच्या मनावर खोट्या गोष्टी बिंबविण्यासाठी हा प्रयोग होत असेल तर उद्या या स्वायत्त संस्थांवर कोण विश्वास ठेवणार, हे राजकीय हत्यार वापरून लोकांपुढे चुकीचे पर्सेप्शन तयार करण्याची भाजपची ही खेळी आहे, अशी टीका रोहीत पवार यांनी केली.

Rohit Pawar
रजोनिवृत्ती निसर्गचक्राचा भाग; सकारात्मक भावनेतून बघा

मराठा आरक्षणावर भाजपला बोलण्याचा हक्क नाही. हा संपूर्ण विषय केंद्राचा आहे. संसदेच्या अधिवेशनात एकाही भाजप खासदाराने हा प्रश्न मांडला नाही. संभाजी राजे यांनाही खासदार संजय राऊत यांच्या हस्तक्षेपानंतर बोलण्याची संधी देण्यात आली, असे आमदार रोहित पवार म्हणाले. ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपा वेगवेगळ्या सभा घेत आहे. हा नुसता आपुलकीच्या देखाव्याचा फुगा आहे, अशी टीका करताना केंद्राने ओबीसीचा २०१४ ला संग्रहित झालेला एम्पिरिकल डाटा राज्याला का दिला नाही, असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी विचारला.

राज्यात अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत बोलताना आमदार रोहित पवार यांनी केंद्राच्या दुजाभावाची चिरफाड केली. नैसर्गिक संकटात केंद्राच्या एनडीआरएफ मदतीचा वाटा मोठा असतो. गेल्यावेळी गुजरातमध्ये वादळ होताच पंतप्रधानांनी दुसऱ्‍याच दिवशी दौरा करून एक हजार कोटींची मदत केली. मात्र, महाराष्ट्रात अतिवृष्टी नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समितीला दोन महिने लागले. राज्यात ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचे मोठे नुकसान झाले. केंद्राची मदत आली नाही. राज्याला जीएसटीचे ३५ हजार कोटी मिळाले नाही, पंधराव्या वित्त आयोगाचे केंद्राने पैसे दिले नाही, असे त्यांनी सांगितले.

Rohit Pawar
पीसीबीने सुधारली ना‘पाक’ कृती; अखेर जर्सीवर टाकले भारताचे नाव

खोटे खोडण्यासाठीच

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी महत्त्वाकांक्षी होते, या देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रपरिषदेतून जे वास्तव घडले ते सांगितले. फडणवीस वारंवार खोटे बोलून खरे करून दाखविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना उत्तर देणे शरद पवार यांना आवश्यक वाटले असावे, असे राहुल पवार यांनी सांगितले.

इंद्रनील यांच्यासाठी आग्रह करणार

हे सरकार तयार करताना वेगळे समीकरण समोर होते. त्यामुसार अनुभवी लोकांना संधी देण्यात आली. पुढे मंत्रिमंडळात बदल झाल्यास आधी पुसदचा वारसा लाभलेले युवा आमदार इंद्रनील नाईक यांच्या मंत्रिपदासाठी आग्रह धरेल, असे रोहित पवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()