मुंबई : कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करणाऱ्या मंत्री, आमदारांनी (MLA) आरटीपीसीआरची चाचणी (RTPCR Test) न करताच त्याचे खोटे रिपोर्ट (Fraud Report) दाखवून अधिवेशनाला हजेरी लावल्याचा संशय आरोग्य खात्यालाच आला आहे. त्यामुळे या नेत्यांसह मंत्रालय, विधानभवनात संसर्ग पसरल्याचे स्पष्ट आहे. अधिवेशनात नेमक्या किती मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठे, कशा प्रकारे चाचण्या केल्या याची नोंदच ना आरोग्य खाते, ना आपत्ती व्यवस्थापनाकडे आहे.
बहुतांशी मंत्री, आमदारांनी खासगी लॅबमध्ये चाचणी केल्याचे ढोबळपणे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र, जुन्याच रिपोर्टवरील तारखा बदलून नवे रिपोर्ट तयार गेल्याचाही संशय यानिमित्ताने व्यक्त केला आहे. कोरोना रुग्ण वाढत असतानाच मुंबईत २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत भरलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात खबरदारी म्हणून ''आरटीपीसीआर'' केले होते.
त्याआधी २१ आणि २२ डिसेंबरला विधानभवनाच्या आवारात मोफत चाचणी सोयही केली होती. पण येथील केंद्रांपेक्षा मंत्री, आमदार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासगी ''लॅब'' ला प्राधान्य दिल्याचे आरोग्य, आपत्ती व्यवस्थापनाने स्पष्ट केले. मात्र, कोणी कुठे आणि कशी चाचणी केली, याची नोंद ठेवण्याची तसदी या दोन्ही खात्यांनी घेतली नाही. तशी ती घेणार नसल्याचा अंदाज असल्याने काहीजणांनी बनावट रिपोर्ट केल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यातही पहिल्या आठवड्यात सलग तीन आणि दुसऱ्या आठवड्यात दोन दिवस ही मंडळी मास्क न बांधताच फिरत असल्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधले होते. तत्कालिन सदस्य रामदास कदम यांनी तर चाचणी केली नसल्याने पोलिसांनी त्यांना रोखले होते.
लग्नसोहळ्यातील हजेरीने प्रसार वाढला
अधिवेशनाच्या काळातच लग्नाच्या तारखा असल्याने काही नेते विवाह सोहळ्यासही उपस्थित होते. त्यातही कोणीही मास्क घातले नसल्याचे उघड झाले. त्यानंतर मंत्री, आमदारांनी शेवटच्या टप्प्यांतील म्हणजे, २७ आणि २८ डिसेंबर या दोन दिवसांत अधिवेशनाला हजर राहिले होते. या दोन दिवसांसाठी म्हणजे, २५ किंवा २६ डिसेंबरला नव्याने चाचणी करणाऱ्यांना प्रवेश होता. लग्नाला हजर राहिलेल्या राजकारण्यांनी पुन्हा चाचण्यांकडे कानाडोळा केल्याचेही सांगण्यात येत आहे. या बेजबाबदारपणामुळेच कोरोनाचा संसर्ग पसरला. अजूनही दररोज मंत्रालय, विधानभवनातील शंभरजन पॉझिटिव्ह येत असल्याचे स्पष्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.