वडेट्टीवार नवीन, आपण मोठे नेते असल्याचं त्यांना राहुल गांधींना दाखवायचं; भाजपचा टोला

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwarsakal
Updated on

Mumbai News - भारत चंद्रावर पोहचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठबळ दिल्याने आज मोहीम यशस्वी झाली, त्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करणे ही नैतिकता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोत गेले. पण विरोधी पक्षाचे नेते यांना ते सहन होत नाही, कारण 65 वर्षांत त्यांनी कधीच अस काही केलं नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी केली.

Vijay Wadettiwar
Mumbai News : मुंबईत काँग्रेसला खिंडार! तीन माजी नगरसेवकांनी दिला राजीनामा; शिंदे गटात जाणार?

आज काँग्रेस ढासाळलेल्या अवस्थेत आहे. भाजपला जनतेचा प्रतिसाद पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भीतीपोटी ते असे विधान करत आहेत. भाजप पक्षाचा इतिहास गौरवशाली आहे, आम्हाला जन्मजात काही मिळालं नाही. काँग्रेस बरखास्त करा असे महात्मा गांधी म्हणाले होते, अशी आठवण बावनकुळे यांनी सांगितली.

Vijay Wadettiwar
राज्यात दुष्काळाची छाया गडद! ३०६ महसूल मंडळात २५ दिवसांपासून नाही पाऊस; ‘खरीप’ला सव्वा लाख कोटींचा फटका

दरम्यान वडेट्टीवार नवीन नवीन विरोधीपक्ष नेते झाले आहे. मी सर्वात ऍक्टिव्ह नेता, मोठा नेता असल्याचं राहुल गांधींना दाखवावं लागत. त्यामुळे ते जनतेला पटत नाही असं बोलतात. वडेट्टीवार ईडी, सीबीआयवर असा अविश्वास दाखवणार असेल तर देशात काहीच राहणार नाही, असंही बावनकुळे यांनी नमूद केलं. वडेट्टीवार म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोला भेट देऊन शास्त्रज्ञांची भेट घेणं वावगं नाही. पण तिथं रोड शो करण्याची काय गरज होती, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी केला.

दरम्यान अनिल देशमुख सध्या जामिनावर आहेत. त्यांनी ऑर्डर बरोबर वाचली नाही. ते जामिनाच्या अटीशर्तींचा भंग करत आहे. अनिल देशमुख आमचे मित्र आहे. शरद पवार यांना काही बोललो नसून त्यांच्या भूमिकेवर बोललो. शरद पवार, सुप्रिया सुळे म्हणतात फूट पडली नाही. त्यावर बोललो, शरद पवार यांना निर्णय घ्यायचा अधिकार असल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलं.

(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.