पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील पालघरमध्ये सुमारे 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत.
पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ असलेले वाढवण बंदर हे भारतातील सर्वात मोठ्या खोल जल बंदरांपैकी एक असेल आणि आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी थेट कनेक्टिव्हिटी पुरवेल.
हे बंदर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असेल. पंतप्रधान सुमारे 360 कोटी रुपये खर्चून मासेमारी जहाजांसाठी एक कम्युनिकेशन सपोर्ट सिस्टीम लॉन्च करतील.
असे असले तरी स्थानिक नागरिक आणि मच्छीमार या प्रकल्पाला मोठा विरोध करत आहेत. कारण या बंदरामुळे भारतातील सर्वात महाग आणि महाराष्ट्राचा राज्य मासा असलेला घोळ माशाच्या पैदाशीवर परिणाम होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर मिळणाऱ्या या घोळ माशाला त्याच्या मांस आणि एयर ब्लॅडरमुळे विशेष मागणी आहे. याचा वापर बिअर आणि वाईन बनवण्यासाठी होतो.
तसेच घोळ माशाचे त्याचे एयर ब्लॅडर औषधात वापरले जाते. घोळ माशाच्या अनेक गुणांमुळे त्याचे मांस आणि एयर ब्लॅडर वेगवेगळे विकले जातात. विशेषत: त्याचे एअर ब्लॅडर मुंबईतून निर्यात केले जाते.
घोळ माशामध्ये अनेक गुण असतात जे आरोग्य आणि चव या दोन्ही दृष्टीने उत्तम मानले जातात. घोळ मासा हा भारतातील सर्वात मोठ्या माशांपैकी एक आहे. हा मासा गुजरात आणि महाराष्ट्रातील सागरी भागात मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याचा रंग हलका सोनेरी असतो. चव आणि आरोग्यदायी गुणधर्मांमुळे याला मोठी मागणी आहे. घोळल मासळी पकडणारे मच्छिमार वर्षभरात करोडो रुपये कमावतात.
घोळ मासळीला त्याच्या बाजारात मिळणाऱ्या उच्च किमतीमुळे'सी गोल्ड' असेही म्हणतात. या माशाला चीन आणि इतर आशियाई देशांच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. घोळ माशाचे मांस युरोपियन आणि मध्य-पूर्व देशांमध्ये निर्यात केले जाते. गुजरातमध्ये एक किलो घोळ माशाची किंमत 5,000 ते 15,000 रुयांपर्यंत आहे.
या माशाचा ड्राय एअर ब्लॅडर, जो सर्वात महाग भाग मानला जातो, त्याची निर्यात बाजारपेठेत प्रति किलो 25,000 रुपयांपर्यंत किंमत असू शकते.
वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन्ही राज्यातील सागरी भागात घोळ आणि सिल्वर पापलेट माशांचे मोठे प्रजनन होते. मात्र, वाढवण बंदरामुळे हे दोन्ही मासे धोक्यात येणार आहेत, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
घोळ माशाचे प्रजनन पालघर समुद्री भागत होते, तर महाराष्ट्राचा राज्य मासा असलेल्या सिल्व्हर पापलेटचे प्रजनन गुरातच्या समुद्री भागात होते. त्यामुळे हे बंदर नैसर्गिक साधनसंपत्तीच्या दृष्टीने हानिकारक असल्याचे मच्छीमार म्हणत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.