Nitesh Rane News : सिंधुदुर्गात दहशत चालणार नाही; राणेंना इशारा

नितेश राणे निर्दोष असते तर त्यांना कोठडीत जावे लागले नसते; वैभव नाईक
vaibhav naik criticism on nitesh rane
vaibhav naik criticism on nitesh raneEsakal
Updated on

सिंधुदुर्ग: शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab ) हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)जर निर्दोष असते तर त्यांना कोठडीत जावे लागले नसते, असा टोला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी लगावला. नितेश राणे यांच्यावर चुकीची कारवाई करण्यात आली असा आरोपही वैभव नाईक यांनी केला आहे.

नितेश राणे (Nitesh Rane)यांना जिल्हा सत्र न्यायालयाने काल जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यांना न्यायालयाने आरोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात येण्यास बंदी घातली आहे. याबाबत वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी नितेश राणे आणि भाजपवर निशाणा साधला आहे. नितेश राणे निर्दोष असते तर त्यांना कोठडीत जावे लागले नसते, असा टोला नाईक यांनी लगावला आहे.(Nitesh Rane News Updates)

वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापुढे कोणाचीही दहशत चालणार नाही. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आता तो सिद्ध होईल किंवा होणार नाही, हा कोर्टाचा निर्णय असेल. मात्र, त्यांचा या हल्ल्यात सहभाग आहे त्यामुळेच त्यांना जेलची हवा खावी लागली. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांनी लक्षात घ्यावे की यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापुढे कोणाचीही दहशत चालणार नाही. असेही ते म्हणाले.

vaibhav naik criticism on nitesh rane
कोर्टाकडून जामीन मंजूर होताच, नितेश राणेंना CPR रुग्णालयातून 'डिस्चार्ज'

नितेश राणेंना या जामीन मंजूर झाल्यानंतर काही अटी घालण्यात आल्या. न्यायालयाने नितेश राणे यांना कणकवली तालुक्यात येण्यास बंदी घातली आहे.याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली सोडून ते कुठेही येऊ शकतात.जोपर्यंत दोषारोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत ते कणकवलीत येऊ शकत नाहीत. आठवड्यातून एकदा तपासासाठी त्यांना ओरस पोलिस स्टेशनला हजर राहावे लागेल. अशा अटी घालण्यात आल्या. यावर शिवसेनेच्या आमदारांनी टिकास्त्र सोडले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()