पोहरादेवी येथील महंत सुनिल महाराज यांनी देखील आज शिवसेनेत प्रवेश केला.
बीड : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. तर, शिवसेना (Shiv Sena) दोन गटात विभागली आहे. शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढत आहे. तर, दुसरीकडं महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी अनके संघटना उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पाठिंबा देत आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देखील उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, आता पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर संकुचित विचारसरणीचे, असा आरोप करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांवर थेट आरोप करत पक्षातील महत्त्वाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते रविकांत राठोड (Ravikant Rathore) यांनी आज शिवबंधन बांधलं आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा मोठा सोहळा पार पडला.
राठोडांच्या पाठोपाठ मराठवाडा, खान्देश, विदर्भातील अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करतील. विशेष म्हणजे, रविकांत राठोड हे बंजारा समाजातील (Banjara Community) बडे नेते आहेत. विदर्भात बंजारा समाजाचे लोकप्रिय नेते शिंदे गटात गेल्याने शिवसेनेला मोठी चिंता होती. मात्र, आता रविकांत राठोड यांच्या शिवसेना प्रवेशानंतर बंजारा समाजाची मतं काबीज करणं शिवसेनेला सोपं जाणार आहे. दरम्यान, यवतमाळच्या पोहरादेवी येथील महंत सुनिल महाराज यांनी देखील आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.