रायगड : रायगड आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा वरंधा घाट 31 ऑगस्टपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याची अधिसूचना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढली आहे. नुकत्याच झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टी दरम्यान दरड कोसळून रस्ता खचला असल्यानं याठिकाणी रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद व धोकादायक झाला आहे. (Varandha Ghat will be closed for traffic till 31 August Find out why)
पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यास दरड कोसळणे, झाडं पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडल्यानं जीवित व वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. सद्य:स्थितीत वरंधा घाटातून प्रवास करणाऱ्या तसेच मालाची ने-आण करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा राष्ट्रीय महामार्ग 31ऑगस्ट 2024 पर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढली आहे.
प्रवासी पर्यटकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.