Video : 'वरून कीर्तन, आतून तमाशा'; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या 'त्या' व्हिडीओवर काँग्रेसचा हल्लाबोल

Devendra Fanavis, Eknath Shinde and Ajit pawar
Devendra Fanavis, Eknath Shinde and Ajit pawar
Updated on

राज्या मराठा आरक्षणाचा मुद्दा काही दिवसांपासून चर्चेत आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडो तुफान व्हायरल होतं आहे. मराठा आंदोनच्या मुद्द्यावर झालेल्या पत्रकार परिषदेला सुरूवात होण्यापूर्वीचा हा व्हिडीओ असून यावरून विरोधकांकडून तीनही नेत्यांवर कडाडून टीका केली जात आहे.

काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. काँग्रेसच्या नेत्या माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील हा व्हिडीओ पोस्ट करत टीका केली आहे. महायुतीचं 'वरून कीर्तन, आतून तमाशा' अशा शब्दात त्यांनी खोचक टोला लगावला आहे.

"सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना महायुती सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्व प्रकाराबद्दल किती गंभीर आहेत, ते समोर आलं आहे. मराठा आरक्षणाबाबत बोलण्याआधी या तिघांमध्ये सुरू असलेली चर्चा माईक सुरू राहिल्याने ऐकू आली. तेवढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांना याची जाणीव करून दिली.. वा, रे वा, शिंदे सरकार!" असे म्हटले आहे.

Devendra Fanavis, Eknath Shinde and Ajit pawar
Maratha Reservation: CM शिंदे, अजित पवार अन् चंद्रकांत पाटील जरांगेंना भेटणार; हालचालींना वेग

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी देखील "बोलून मोकळे होणाऱ्या या तिघांचेही "आग लगे बस्ती में हम अपने मस्ती में " अशा मानसिकतेवर एकमत.... निवडणुकांनंतर या तिघांना सत्तेतून मोकळे करण्यासाठी जनतेत ही एकमत....." असं कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे.

Devendra Fanavis, Eknath Shinde and Ajit pawar
Vietnam Fire: व्हिएतनाममध्ये पुन्हा अग्नीतांडव! नऊ मजली इमारतीला भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू

त्या व्हिडीओत काय आहे?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेपूर्वीचा हा व्हिडीओ असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपण बोलून मोकळं व्हायचं असं वक्तव्य करताना ऐकू येत आहेत.

नेमका काय संवाद?

एकनाथ शिंदे – आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.

अजित पवार – हो……येस

देवेंद्र फडणवीस – माईक चालू आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाबाबत जी चर्चा झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत भूमिका मांडण्याआधीचा हा संवाद असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.