Vasant More resigns : राज ठाकरेंची २९ वर्षांची साथ सोडणारे वसंत मोरे कोण आहेत? कशी झाली राजकारणात एन्ट्री?

Vasant More MNS : 'साहेब मला माफ करा.. जय महाराष्ट्र' असं म्हणत मनसेचे निष्ठावान कार्यकर्ते वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मागच्या काही वर्षांपासून वसंत मोरे नाराज असल्याचं उघड झालेलं होतं. परंतु त्यांनी राज ठाकरेंवरची निष्ठा कधीच ढळू दिली नव्हती.
Vasant More resigns
Vasant More resignsesakal
Updated on

Vasant More MNS : 'जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा' असं म्हणत मनसेचे निष्ठावान कार्यकर्ते वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मागच्या काही वर्षांपासून वसंत मोरे नाराज असल्याचं उघड झालेलं होतं. परंतु त्यांनी राज ठाकरेंवरची निष्ठा कधीच ढळू दिली नव्हती. परंतु मंगळवारी त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. ते लोकसभेसाठी इच्छूक असल्याचं मागेच स्पष्ट झालं होतं.

कोण आहेत वसंत मोरे?

वसंत कृष्णाजी मोरे यांचा जन्म १० ऑक्टोबर १९७५ रोजी पुण्यात झाला. त्यांनी शालेय शिक्षण कात्रजच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातून पूर्ण केलं. पुढे त्यांनी शाहू मंदिर महाविद्यालातून उच्च शिक्षण पूर्ण केलं.

मागच्या २९ ते ३० वर्षांपासून वसंत मोरे हे राजकीय आणि समाजिक जीवनात काम करत आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी २००६ मध्ये राज ठाकरेंसोबत मनसेमध्ये प्रवेश केला. पुढे २००७ मध्ये मनसेला महानगर पालिका निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं. त्यात वसंत मोरेंचा सिंहाचा वाटा होता.

पुण्यात मनसेला बळ दिलं दिलं

वसंत मोरे यांच्यामुळे २००७ मध्ये पुण्यात मनसेला तब्बल आठ नगरसेवक निवडून आणता आले. पुढे २०१२ मध्ये मनसेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले होते. वसंत मोरेदेखील त्यावेळी निवडून आले. २०१४ मध्ये कात्रज विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता.

२०१७ मध्ये वसंत मोरे हे पु्न्हा नगरसेवक म्हणून निवडून गेले. पुढे त्यांच्याकडे महानगर पालिकेत विरोधी पक्षनेते पद होतं. परंतु मागच्या दोन ते तीन वर्षांपासून वसंत मोरे यांची नाराजी उघड झालेली आहे. पक्षाने त्यांच्याकडील पद काढून घेतलं होतं. तेव्हा ते पक्ष सोडतील, असं सांगितलं जात होतं. पंरतु त्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली नाही.

भोंग्याविरोधातल्या मोहिमेला केला विरोध

राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदीवरील भोंग्यांवरुन रान उठवलं होतं. बेकायदेशीर भोंगे काढले नाही तर लाऊड स्पिकरवरुन हनुमान चालिसा पठण केलं जाणार होतं. परंतु या आंदोलनाला वसंत मोरे यांनी विरोध केला होता. कारण त्यांच्या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. आपल्याला निवडून देणाऱ्यांमध्ये मुस्लिम आहेत, असं म्हणत त्यांनी त्यावेळी वेगळी भूमिका घेतली होती.

लोकसभा लढण्याची तयारी...

मागे एका मुलाखतीमध्ये वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. परंतु पक्षामध्ये कायमच त्यांचे खटके उडत गेले. त्यांची नाराजी वरचेवर वाढतच गेली. अखेर मंगळवारी त्यांनी राजीनामा दिला. आता ते लोकसभेच्या रणांगणात उतरतील, अशी चर्चा आहे. नुकतंच त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे ते शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.