Vasant More: वसंत मोरेंचं ठरलं! लवकरच ठाकरे गटात प्रवेश; विधानसभेला 'या' जागेचं मिळणार तिकीट?

Vasant More will join thackeray group: वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती.
Vasant More
Vasant More
Updated on

मुंबई- वसंत मोरे हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यांसदर्भात माहिती देताना सांगितलं की, वसंत मोरे ठाकरे गटामध्ये प्रवेश करतील. वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती.

वसंत मोरे यांना पुण्यातून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. मात्र, तरी त्यांचा पराभव झाला होता. आता ते ठाकरे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. आज ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता ही भेट होईल. याचवेळी त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, वसंत मोरे आमच्याकडे येत आहेत.

Vasant More
MP Sanjay Singh : ...ही तर न्यायव्यवस्थेची चेष्टा; खासदार संजय सिंह यांची केंद्रावर टीका

सूत्रांच्या माहितीनुसार, हडपसर किंवा खडकवासला या विधानसभा मतदारसंघातून त्यांना आमदारकीचं तिकीट मिळू शकतं. वसंत मोरे यांनी हडपसर विधानसभेची मागणी केली आहे. आज मोरे उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे. यावेळी वसंत मोरे मोठा निर्णय घेऊ शकतात.

Vasant More
Nanded Constituency Lok Sabha Election Result: अशोक चव्हाणांच्या नाराजीचा भाजपला फटका! काँग्रेसच्या वसंत चव्हाणांचा विजय

वसंत मोरे यांना मनसेकडून लोकसभा लढण्याची इच्छा होती. पण, मनसेने लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. मनसेकडून राज्यात सर्वेक्षण करण्यात आले होते. यात, लोकसभा निवडणूक पक्षासाठी अनुकूल नसल्याचा अहवाल मिळाला होता. शिवाय, पुण्यामध्ये देखील मनसेचा उमेदवार जिंकून येणार नाही अशा प्रकारचा अहवाल मनसे प्रमुखांना पाठवण्यात आला होता.

पुण्यातून लोकसभा लढवण्यावर ठाम असणाऱ्या वसंत मोरे यांनी यामुळे मनसेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी महाआघाडीकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी अपक्ष लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांना यश मिळाले नाही. आता आमदारकीसाठी त्यांची तयारी सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.