Vasant More: तारीख ठरली! वसंत मोरेंचा या दिवशी होणार ठाकरे गटात प्रवेश; विधानसभेला मिळणार तिकीट?

Vasant More will join thackeray group: वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती.
Vasant More
Vasant MoreEsakal
Updated on

मुंबई- वसंत मोरे हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहेत. वसंत मोरे यांनी आज उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. वसंत मोरे ९ जुलैला ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. वसंत मोरे वंचितचा साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. वसंत मोरे खडकवासला किंवा हडपसर मतदारसंघातून विधानसभा लढवणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Vasant More
Vasant More: वसंत मोरेंचं ठरलं! लवकरच ठाकरे गटात प्रवेश; विधानसभेला 'या' जागेचं मिळणार तिकीट?

याबाबत माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, आज पक्षप्रमुखांची भेट घेतली. ९ जुलै रोजी माझा मातोश्रीवर पक्षप्रवेश पार पडणार आहे. सर्व प्राथमिक चर्चा या भेटीत पार पडल्या. त्यांनी ९ तारीख दिली आहे. त्या दिवशी मी माझ्या समर्थकांसह पक्षप्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणुकीबाबत ते म्हणाले, पक्षप्रवेश तर होत आहे, बाकी बाबी पक्षप्रमुख ठरवतील. पण मी परत एकदा स्वगृही परत आलो आहे.

Vasant More
Ambadas Danve: अंबादास दानवेंना निलंबनातून सूट; पाच दिवसांऐवजी...

तर वंचित सोडण्यावर मोरे म्हणाले, मी वंचितमध्ये गेलो. वंतिच मतदारांनी मला स्वीकारलं नाही. त्यामुळं मी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना यांसदर्भात माहिती देताना सांगितलं की, वसंत मोरे ठाकरे गटामध्ये प्रवेश करतील. वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती.

Vasant More
Dhangar Reservation : मराठवाड्यात पुन्हा उपोषण; धनगर समाजाला 'एसटी'तून आरक्षण देण्याची मागणी

सूत्रांच्या माहितीनुसार, हडपसर किंवा खडकवासला या विधानसभा मतदारसंघातून त्यांना आमदारकीचं तिकीट मिळू शकते. वसंत मोरे यांनी हडपसर विधानसभेची मागणी केली आहे. आज मोरे उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे.

वसंत मोरे यांना पुण्यातून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. मात्र, तरी त्यांचा पराभव झाला होता. आता ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, वसंत मोरे आमच्याकडे येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.