...तर 50-50 टक्के जागा लढवू; प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला स्पष्टच सांगून टाकलं

vba prakash ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीबाबत भाष्य केलंय. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच आता बोलावं. त्यांना फॉर्म्युला मान्य आहे का नाही ते सांगावं.
vba prakash ambedkar
vba prakash ambedkar
Updated on

मुंबई- वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीबाबत भाष्य केलंय. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच आता बोलावं. त्यांना फॉर्म्युला मान्य आहे का नाही ते सांगावं. मान्य नसेल तर तसही सांगावं. त्याप्रमाणे काय करता येईल ठरवता येईल. महाविकास आघाडी अडीच वर्षांपासून सत्तेपासून दूर आहे. खूप बैठका झाल्या, पण अद्याप ४८ जागांवर निर्णय होऊ शकलेला नाही, असं ते म्हणाले.

शरद पवारांना मी उघड पत्र लिहिलं आहे. त्यामुळे लपून असं काहीच नाही. आमची आणि शिवसेनेची युती आहे. आमचं असं ठरलंय की शिवसेनेचं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जमलं नाही, तर आम्ही ५०-५० जागा लढू. आम्ही अगोदरच ठरवलं आहे, असं आबंडेकर म्हणाले. (vba prakash ambedkar criticize bjp statement about mahavikas aaghadi alliance with shivsena ncp congress)

vba prakash ambedkar
Explained: कसं असेल महाराष्ट्रातील जागावाटपाचे प्लॅनिंग; NDA VS INDIA, वंचित ठरणार कळीचा मुद्दा

इंडिया आघाडीतील महत्त्वाचा पक्ष काँग्रेस आहे. पण, त्यांच्यामध्ये गोंधळ पाहायला मिळत आहे. आमच्या आठ जागा काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे गेल्या असा आरोप आम्हीही करु शकतो. पण, जे झालं ते झालं. राजकीय पक्ष आहे म्हणल्यास निवडणूक लढवल्या जाणारच. त्यामुळे कोण हारलं आणि कोण जिंकलं हे उकरुन काढण्यात काही अर्थ नाही, असं ते म्हणाले.

जमलं तर जमलं नाही जमलं तर नाही जमलं. पुढच्या आठवड्यापासून आम्ही आमचे निवडणुकीचे मुद्दे जनतेसमोर मांडत जाणार आहोत. भाजपने मुस्लिमांच्या संदर्भात द्वेष पूर्ण टोकाला नेला आहे. द्वेष हाच त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. आता ओबीसी-मराठ्यांमध्ये वाद निर्माण करण्यात आला आहे. या दोन समाजातील भावना वाढणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत, असं आंबेडकर म्हणाले.

vba prakash ambedkar
Prakash Ambedkar: 'मोदींना हटवले नाहीतर...'! प्रकाश आंबेडकरांनी वर्तवली भिती, आघाडीला दिला 'हा' इशारा

सत्ता आणि धर्म या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सत्तेमध्ये रोजगार देणं, विकास करणं हे काम असतं. धार्मिक मुद्दा हा खासगी आहे. लोकांना यातील भेद आता कळू लागलं आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार असा लढा सुरु आहे. या स्पर्धेमध्ये ठाकरे- शरद पवारांनी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असंही ते म्हणाले.

टाईमबाँड ठेवण्याचा एकच उद्देश होता. मार्चमध्ये निवडणुका लागणार आहेत. मी मोठं वक्तव्य करत नाही, पण भाजप विरुद्ध वंचित अशी थेट लढत होणार आहे. पण, आम्हाला यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं आहे. पक्षाची ताकद वाया जावू नये यासाठी आम्ही वेळ आखून घेतला आहे. तरी आम्ही शेवटपर्यंत महाआघाडीसाठी थांबू. पण, आम्हाला आमच्या पक्षाचे कार्य सुरु करावे लागेल, असं आंबेडकर म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.