Prataprao Gujar : 'वेडात मराठे वीर दौडले सात', आजच्याच दिवशी झाला होता नेसरीचा रणसंग्राम...

म्यानातुनि उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात !
Prataprao Gujar
Prataprao Gujaresakal
Updated on

Prataprao Gujar : महाराष्ट्राला ख-या अर्थाने महान राष्ट्र बनविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने व शेकडो मावळ्यांच्या बलिदानाने मराठा स्वराज्य उभारले गेले. महाराजांशी निष्ठा व स्वराज्यासाठीची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसांत भिनली होती. या शेकडो वीरांच्या शौर्याची साक्ष मातीचा कण नी कण देतो. स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या वीरांच्या आठवणींशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही. 

म्यानातुनि उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात !

वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्राजांनी लिहीलेलं आणि लता मंगेशकर यांनी लिहिलेलं हे गाणं नुसतं गाणं ऐकलं तरी अंगात वेगळीच एनर्जी संचारल्या सारखं वाटतं अन् मराठ्यांचा ज्वलंत इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी शौर्य गाजवलेला तो दिवस होता २४ फेब्रुवारी १६७४.

Prataprao Gujar
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवराय अखिल विश्वाचे प्रेरणास्थान : संजय वाघ

प्रतापरावांचा पराक्रम...
प्रतापरावांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्‍यातील ताम्हाणे उर्फ गोरेगाव होते. प्रतापरावांचे मूळ नाव कडतोजी; शिवरायांच्या सैन्यातील एक शिलेदार म्हणून काम करतच पराक्रमाच्या व जिद्‌दीच्या जोरावर ते स्वराज्याचे सरनोबत झाले. कडतोजींचा पराक्रम पाहून त्यांना "प्रतापराव" किताब देवून गौरवण्यात आले होते.

Prataprao Gujar
Chhatrapati Shivaji Maharaj: अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस जयंतीनिमित्त अभिवादन

नेसरीचा रणसंग्राम...
उमराणीच्या लढाईत प्रतापरावांच्याकडून अभय मिळालेला बेहेलोल खान पुन्हा स्वराज्यात धूमाकूळ घालू लागला होता. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ येत असतानाच "बेहेलोल खान पुन्हा स्वराज्यावर चालून येत आहे. वेळीच त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हास तोंड दाखवू नका" अशा आशयाचा खलिता महाराजांनी प्रतापरावांना पाठविला.

Prataprao Gujar
Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांना एवढ्या उपाध्या कुणी आणि कशा दिल्या?

खलिता हाती येताच प्रतापरावांचे रक्‍त सळसळू लागले. आपल्या प्राणापेक्षा प्रिय असणा-या महाराजांचा हुकूम पाळायचा या उद्देशाने प्रतापराव गुर्जर संधी शोधत होते. एकेदिवसी ते आपल्या सहा सरदारांसोबत फेरफटका मारायला निघाले असताना बहलोल खान जवळच असल्याचे त्यांना समजले. तो दिवस होता महाशिवरात्रीचा होता.

Prataprao Gujar
Sinhagad Fort : आत्मविश्वास गमावलेले चेहरे : प्रतिक्रियेला होती अश्रूंची किनार

तेव्हा त्यांनी सैन्याची वाट न पाहता सहा सरदारांसोबत बहलोल खानाच्या दिशेने निघाले. यावेळी त्यांच्यासोबत सरदार विसाजी बल्लाळ, दिपाजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोजी होते. या सात जणांनी खानाच्या सैन्याशी निकराचा लढा दिला, मात्र सातही जणांना वीर मरण आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.