मुंबई : कोरोना संकटामुळे (coronavirus) गतवर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावा (dussehra-melawa) शिवतीर्थावर झाला नाही. अगदी मोजके महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. परंतु आता कोरोनाचं संकट ओसरु लागलं आहे. त्यामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा नियम आणि संकेत पाळून साजरा करण्यात येणार आहे. दसऱ्याला पार पडणाऱ्या मेळाव्याची जागा अखेर ठरली आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा अखेर ठरली
मुंबईला (mumbai) तिसऱ्या लाटेचा (corona third wave) कसलाही धोका नाही, काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (mayor kishori pednekar) यांनी याबाबत स्पष्ट केलं आहे. त्यानंतर सेनेचा दसरा मेळावा घेण्यासंबंधी हालचाली वाढल्या होत्या. यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा अखेर ठरली असून मुंबई सायनच्या (शीव) षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा पार पडणार आहे. 50 टक्क्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार असून सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा
दरम्यान कोरोनाचं संकट जरासं ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचं नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असं सांगत दसरा मेळावा होणार असल्याचे संकेतच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले होते.
मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नाही!
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका उरलेला नाही, असा दावा मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे. महानगरपालिकेने उच्च न्यायालयात तशी माहिती दिली. मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या 2586 नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर 3942 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. याशिवाय, शहरातील 42 लाख सामान्य नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर 82 लाख नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. सध्याचा केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात सुरु असल्याने लसीकरण मोहीम पूर्ण वेगात सुरु आहे. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही, असे पालिकेने न्यायालयात सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.