मुंबई, 10 ऑक्टोबर: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबईत व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट (VGGS) 2024 च्या रोड शोचे नेतृत्व करणार आहेत. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या यशाची 20 वर्षे पंतप्रधानांची ‘विकसित भारत@2047’ ची संकल्पना आणि त्यासाठी गुजरातची तयारी याविषयी मुख्यमंत्री भाषण करतील.
एकीकडे मुंबईतील, महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात असतानाच गुजरात सरकारचा मुंबईत कार्यक्रम होणार आहे. मुंबईतील ताजमहाल पॅलेस इथे होणाऱ्या कार्यक्रमाचा उद्धेश महाराष्ट्रातील उद्योग आकर्षित करणे हा आहे. त्यानंतर मुंबईमध्ये रोड शोचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यामाध्यमातून गुजरात सरकार महाराष्ट्रातील उद्योगाशी साधणार संवाद आहे. राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याची टीका विरोधक करत असताना या कार्यक्रमामुळे वाद होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्लीच्या शुभारंभ कार्यक्रमामध्ये 1500 हून अधिक गुंतवणूकदार आणि उद्योजकांचा सहभाग होता. 119 हून अधिक डिप्लोमॅट्सनी मिशन प्रमुखांशी संवाद साधला. नवी दिल्लीतील कार्यक्रमाच्या भव्य यशानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरात सरकार मुंबईत रोड शो आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे.
हा कार्यक्रम फिनटेक, आयटी, बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा अशा विविध क्षेत्रांमध्ये तसेच गुजरातच्या आगामी मेगा प्रकल्पांमध्ये मोठ्या गुंतवणुकीला आकर्षित करेल. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 द्वारे गुजरातला ‘गेटवे टू द फ्यूचर’ म्हणून ठळक करण्याचा सरकारचा उद्देश आहे.
या रोड शोला अर्थ, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स मंत्री श्री. कनुभाई देसाई, उद्योग मंत्री श्री बलवंतसिंह राजपूत, राज्यमंत्री (गृह आणि पोलीस गृहनिर्माण, उद्योग, सांस्कृतिक उपक्रम) श्री हर्ष संघवी, राज्यमंत्री (MSME, कुटीर, खादी आणि ग्रामीण उद्योग, नागरी विमान वाहतूक) श्री जगदीश विश्वकर्मा आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य प्रधान सचिव श्री के. कैलाशनाथन उपस्थित राहणार आहेत.
श्री. आर. दिनेश, अध्यक्ष, CII आणि कार्यकारी उपाध्यक्ष, TVS सप्लाय चैन सोल्युशन्स स्वागतपर भाषण करतील. त्यानंतर चित्रफितीचे स्क्रिनिंग व नंतर उद्योग आणि खाण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. एस.जे. हैदर व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 यावर सादरीकरण करतील.
या कार्यक्रमात प्रख्यात उद्योगपती गुजरातबद्दलचे अनुभव शेअर करणार असून गुजरात सरकारचे मुख्य सचिव श्री. राज कुमार यांचे अभिभाषणही या कार्यक्रमात पाहायला मिळेल. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.