Mahavikas Aghadi: काँग्रेसच्या 'या' मागणीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी? पवार अन् ठाकरे झाले नाराज?

Sharad Pawar : या जागांचा तिढा न सुटल्यास त्याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
Mahavikas Aghadi: काँग्रेसच्या 'या' मागणीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी? पवार अन् ठाकरे झाले नाराज?
Updated on

Mahavikas Aghadali News: महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे असे वाटत असतानाच विदर्भातील ६२ जागांपैकी ४५ जागांवर काँग्रेसने दावा केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्या (ता. १) पुन्हा महाविकास आघाडीचे नेते विदर्भातील जागा वाटपावर चर्चा करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत अमरावती, रामटेक या हक्काच्या जागा सोडल्याने विदर्भातील विधानसभेच्या जागा मिळाव्यात, असा आग्रह शिवसेना ठाकरे पक्षाने धरला आहे. तर वर्ध्याची जागा शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने जिंकल्याने त्यांनीही दहा ते बारा जागांवर दावा केला आहे.

Mahavikas Aghadi: काँग्रेसच्या 'या' मागणीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी? पवार अन् ठाकरे झाले नाराज?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कोल्हापूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष पदी आदिक जाधव यांची निवड

दसऱ्यापूर्वी जागावाटप पूर्ण करण्याचे महविकास आघाडीने निश्चित केले आहे. महाविकास आघाडीतील जवळपास ८० टक्के जागांवरील तिढा सुटल्याचे पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात वेगळेच चित्र असून मुंबई व परिसरातील मतदारसंघाच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाने नमते न घेतल्याने काँग्रेस नेत्यांनी विदर्भातील ६२ पैकी किमान ४५ जागा लढविण्याचा हट्ट धरला आहे. विदर्भातून काँग्रेसकडे ६२ जागांसाठी ४०० हून अधिक इच्छुकांचे अर्ज आले आहेत.

Mahavikas Aghadi: काँग्रेसच्या 'या' मागणीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी? पवार अन् ठाकरे झाले नाराज?
Congress : वादग्रस्त वक्तव्य भोवलं! 'या' बड्या नेत्याची काँग्रेसमधून हकालपट्टी, रेड्डींवर अध्यक्षपदाची जबाबदारी

..तर निर्णय वरिष्ठ पातळीवर

शिवसेना ठाकरे पक्षाला विदर्भातून दुहेरी आकड्यातील जागांची अपेक्षा आहे तर, राष्ट्रवादीचीही १२ ते १५ जागांवर नजर आहे. मात्र, विदर्भात हमखास यश मिळण्याची खात्री असल्याने काँग्रेस नेत्यांची जागा सोडण्याची तयारी नाही. विशेषत:, २०१९ मध्ये शिवसेनेने लढविलेल्या जागांवर काँग्रेसने दावा केला आहे आणि त्या जागा सोडण्यास त्यांची तयारी नाही. मात्र, त्यातही या जागांचा तिढा न सुटल्यास त्याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

Mahavikas Aghadi: काँग्रेसच्या 'या' मागणीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी? पवार अन् ठाकरे झाले नाराज?
Maharashtra Congress: वडेट्टीवार-धानोरकरांच्या दिल्लीच्या बैठकीत नक्की काय झालं? वाचा इनसाईड स्टोरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.