कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मंगळवारी पाऊस झाला.
पुणे - विदर्भात बुधवारी (ता.२४) तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर पुणे आणि परिसरात येत्या दोन दिवसांत आकाश अंशत: ढगाळ राहणार असून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
तर, मंगळवारी कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. कोकणात दापोली, चिपळूण, पोलादपूर, सावंतवाडी, गुहागर, वैभववाडी येथे पाऊस झाला. तर मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर, गगनबावडा, शाहूवाडी, लोणावळा, इगतपुरी येथे पाऊस झाल्याची नोंद हवामानशास्त्र विभागाने केली आहे.
राज्यात गुरुवारी (ता.२५) ते शनिवार (ता.२७) या कालावधीत कोकणात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज आहे. तर पुणे आणि परिसरात पावसाचा जोर आणखी कमी होणार असून या काळात वातावरण ढगाळ आणि अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.