Vidhan Parishad : भाजपाच्या विधान परिषदेसाठी पाच जणांच्या नावांची यादी जाहीर; पंकजा मुंडेंचे पुनर्वसन अन् सदाभाऊ खोतांनांही संधी

vidhan parishad election : विधानपरिषदेसाठी भाजपकडून पाच नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Pankaja Munde
Pankaja Mundeesakal
Updated on

विधानपरिषदेसाठी भाजपकडून पाच नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांची देखील विधान परिषदेवर वर्णी लागली असून यासोबत सदाभाऊ खोत, अमित गोरखे, परिणय फुके, योगेश टिळेकर यांच्या नावाचा देखील यामध्ये समावेश आहे. साम टीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

या निवडणुकीत भाजपकडून पाच, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दोन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दोन उमेदवार दिले जातील असे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीकडून दोन उमेदवार दिले जातील असे सांगितले जात आहे. पण महाविकास आघाडीने जर तिसरा उमेदवार दिला तर भाजपकडून एक अपक्ष उमेदवार दिला जाईल असं सांगितले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pankaja Munde
Rohit Sharma on his Retirement: 'मला निवृत्ती घेऊ वाटत नव्हती पण...', रोहित शर्माने रिटायरमेंटबाबत केला मोठा खुलासा

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार १२ जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मजमोजणीही पार पडेल. विधानसभा आमदारांनी निवडून दिलेल्या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक जाहीर करण्यात आली होती.

Pankaja Munde
Ladki Bahini Yojana: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'साठी अर्ज करण्यास 'या' 15 दिवसांचीच मुदत! ही' कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?

निवडणुकीचा कार्यक्रम

  • नोटिफिकेशन - मंगळवार, २५ जून २०२४

  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख - मंगळवार, २ जुलै २०२४

  • उमेदवारी अर्जांची छाननी - बुधवार, ३ जुलै २०२४

  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख - शुक्रवार, ५ जुलै २०२४

  • निवडणूक दिनांक - शुक्रवार १२ जुलै २०२४

  • मतदानाची वेळ - सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत

  • मतमोजणी - शुक्रवार, १२ जुलै २०२४. संध्याकाळी ५ वाजता.

  • निवडणूक कार्यक्रम पूर्ण होण्याचा दिनांक - मंगळवार, १६ जुलै २०२४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com