राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केल्यानंतर भाजप पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचं ठरणार आहे. एकही आमदार रणांगणाबाहेर राहू नये यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांकडून खबरादारी घेतली जात आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेत देखील मुक्ता टिळक हक्क बजवणार आहेत. त्यासाठी त्या उद्या ऍम्ब्युलन्सने मुंबईत दाखल होणार आहे.
भाजपने राज्यातील सर्व आमदारांना 18 जून रोजी मुंबईत बोलावलं आहे. मुंबईत ताज प्रेसिडन्सी हॉटेलमध्ये या आमदारांचा मुक्काम असेल. भाजपने राज्यसभेप्रमाणे येथेही एक टास्क फोर्स नेमली आहे. आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी या त्रिमूर्तींवर टाकली आहे.
मुक्ता टिळक पक्षादेश पाळत विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पुन्हा मुंबईला येणार आहे. यापूर्वी, राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी ते रुग्णवाहिकेतून आले होते. डॉक्टरच्या सल्लाने या दोन्ही आमदारांनी योग्य ती काळजी घेऊन आजारपणातही मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. टिळक यांच्या या निर्णयामुळे भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे
आमदार मुक्ता टिळक या आजारपणात बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना देखील अॅम्बुलन्सतमधून विधानभवनात मतदानासाठी गेल्या होत्या. त्यांनी पीपीई कीट, मास्क घालून स्ट्रेचरवरून जात मतदान केले. टिळक यांची धडाडी पाहून पक्षाच्या नेत्यांनी दाद दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.