राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात विधान परिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात विधान परिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी कंबर कसली अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीत सत्ता आणि संख्याबळ असूनही पराभव स्विकारावा लागल्याने यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिशदेसाठी अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत आहे. (Vidhan Parishad Election 2022)
विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचा हा गड भाजपने मारल्यास अपक्ष आमदार आणि लहान पक्षांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट होईल. मुख्यमंत्री ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) यांच्या प्रतिमेला ही बाब मारक ठरू शकते.
विधानपरिषद निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत बाजी मारण्याचा निश्चय मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला असून तसे नियोजन सुरु केले आहे. यासाठी आज त्यांनी वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक बोलावली आहे. (Vidhanparishad Election 2022) या बैठकीला महाआघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे.
विधानपरिषेदच्या दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी अपक्ष आमदार आणि लहान पक्षांना हाताशी धरून मतांची जुळवाजुळव कशाप्रकारे करायची याची रणनीती आज वर्षा बंगल्यावरही बैठकीत आखली जाईल. त्यामुळे या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोणत्या सूचना देतात, हे पाहावे लागेल.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना १८ जून रोजी मुक्कामासाठी मुंबईत दाखल होण्याचा आदेश दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यांनी आधीपासूनच खबरदारीचे सर्व उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी निवडणुकीच्या दोन दिवस आधीच म्हणजेच १८ जूनला पक्षाच्या सर्व आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांना पवई येथील हॉटेल रिनेसन्समध्ये मुक्कामी बोलावले आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.